मृत आरोपींना दाखविले जिवंत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

निदान माझ्या कार्यकाळात तरी एटीएसमध्ये असे काही घडले नव्हते.
- के.पी. रघुवंशी, माजी एटीएसप्रमुख

मुंबई : मालेगाव येथे झालेल्या 2008 मधील स्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकातील एका निलंबित अधिकाऱ्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. निलंबित माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी मेहमूद मुजावर यांनी सोलापूर न्यायालयासमोर या प्रकरणातील दोन फरार आरोपींचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जिवंत दाखविल्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप गंभीर असून, सरकार या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे म्हटले आहे. मुजावर यांनी सोलापूर न्यायालयात याबाबत ऑगस्टमध्ये याचिका दाखल करत संदीप डांगे आणि रामचंद्र कलसंगरा हे दोन्ही आरोपी जिवंत नसल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे मुजावर यांना शस्त्रास्त्र कायदा आणि गुन्हेगारी कारवायांतर्गत कायद्याखाली निलंबित करण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींना फरार घोषित करण्यात आले; परंतु त्या वेळी ते या जगातच नसल्याचा दावा आता मुजावर यांनी केला आहे.

Web Title: dead accused shown