बॅगमध्ये आढळले मृत अर्भक 

बॅगमध्ये आढळले मृत अर्भक 

ठाणे : ठाण्यात वर्तकनगरमधील नाल्यामध्ये फेकण्यात आलेल्या बॅगमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. स्थानिकांनी वर्तकनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर ठाणे मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सदरचे अर्भक ताब्यात घेऊन, जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार आणि तपासणीसाठी दाखल केले. या घटनेची नोंद वर्तकनगर पोलिस ठाण्यात केली असून बॅगमालकाचा शोध सुरू आहे. 

ठाण्यातील पोखरण रोड नं.1 येथील सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिरानजीकच्या नाल्यात सफाई कामगाराला एक बॅग सापडली. बॅगेत मृत अर्भक आढळल्याने, कामगाराने घाबरून बॅग तेथेच टाकून दिली. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी वर्तकनगर पोलिस आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी नाल्यातून बॅग वर काढून बॅगमधील अर्भक जिल्हा रुग्णालयात पाठवले. अज्ञात व्यक्तीने अर्भक बॅगमध्ये भरून दोन ते तीन दिवसांपूर्वीच नाल्यात फेकले असावे, असा अंदाज आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी वर्तविला. 

पाच महिन्यांतील चौथी घटना 
मागील पाच महिन्यांत ठाण्यात नवजात अर्भक आढळल्याची चौथी घटना आहे. यापूर्वी 18 जुलै रोजी कासारवडवली पार्कवूड येथील नाल्यात पुरुष जातीचे मृत अर्भक आढळले. 8 ऑगस्ट रोजी मुंब्रा, गावदेवी परिसरातील सार्वजनिक शौचालयात जिवंत अर्भक फेकणाऱ्या महिलेला पोलिसांनी शोधून काढले होते; तर, 14 ऑक्‍टोबर रोजी लोकमान्यनगर पाडा नं.4 येथील नाल्यात पुरुष जातीचे मृत अर्भक आढळले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com