पालिकेच्या उपाहारगृहातील जेवणात उंदाराची विष्ठा? 

पालिकेच्या उपाहारगृहातील जेवणात उंदाराची विष्ठा? 

वाशी - नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय कक्षात असणाऱ्या उपाहारगृहामध्ये कर्मचारी जेवण करत असताना अन्नामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा प्रकार शनिवारी (ता.6) सायंकाळी घडला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपाहारगृहांच्या स्वयंपाकगृहामध्ये पाहिले असता बेसिनमध्ये मृतावस्थेतील उंदीर पाण्यावर तरंगतना आढळून आला. कर्मचाऱ्यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत उपाहारगृहाच्या व्यवस्थापकाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. 

कर्मचाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी संघटनेकडे धाव घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. या वेळी नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी संघटनेने पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना पालिकेच्या उपाहारगृहातील जेवणात उंदराची विष्ठा आढळणे, ही बाब गंभीर असल्याने हा कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास धोका असल्याचे सांगितले. तर आयुक्तांनी स्वत: यामध्ये लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांना केली आहे. या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिका कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी या संदर्भात अन्न व औषध प्रशासनालादेखील तक्रार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

या संदर्भात अद्यापपर्यत कोणतीही तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही; परंतु उपाहारगृह चालकाला तत्काळ या संदर्भात नोटीस बजावण्यात येईल. 
- चित्रा बाविस्कर, सचिव, नवी मुंबई महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com