ठाणे : कुख्यात मटका किंगवर जीवघेणा हल्ला

दीपक शेलार
रविवार, 22 सप्टेंबर 2019

कुख्यात मटका किंग बाबू नाडर (रा. कोपरी, ठाणे पूर्व) याच्यावर एका तरूणाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री कोपरीतील सिंधी कँप बाजारपेठेत घडली.

ठाणे : कुख्यात मटका किंग बाबू नाडर (रा. कोपरी, ठाणे पूर्व) याच्यावर एका तरूणाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना शनीवारी रात्री कोपरीतील सिंधी कँप बाजारपेठेत घडली.

दरम्यान, जखमी नाडर याच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू असून, नाडर यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी कोपरी पोलिस पोचले असून, हल्लेखोर तिघा तरुणाचा शोध सुरू आहे. हल्लेखोर त्याच परिसरात राहणारे असून, नाडर याच्यावर हल्ला पुर्ववैमनस्यातून केल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadly attack on infamous Matka King