महागाईमुळे जीव मेटाकुटीला

Sayali-Bhere
Sayali-Bhere

नाव : सायली भेरे
वय : ४० 
उत्पन्नाचा स्त्रोत : 
घरकाम करून उदरनिर्वाह
दरमहा उत्पन्न : 
४५०० रुपये
कुटुंबातील व्यक्ती : 
स्वत:, दोन मुले 
आणि नणंद, सासूबाई

पतीचे २०१२मध्ये निधन झाल्यानंतर सायली भेरे यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. कर्ता माणूस गेल्याने त्यांना स्वत: काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. धुणीभांडी करून पाच वर्षे त्या संसाराचा गाडा हाकत आहेत. महिन्याकाठी अवघे साडेचार हजार कमवून चौघांचे कुटुंब सांभाळणाऱ्या भेरे यांचा जीव महागाईमुळे मेटाकुटीला आला आहे. शाळा-ट्युशन फीमध्ये वाढ झाल्याने भेरे यांना मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावत आहे.  

भाजीपाला, कांदे-बटाटे, डाळी यांच्या भावात चढ-उतार होत असल्याने किचनचे बजेट कोलमडले आहे. दुधाच्या दरात अर्धा लिटरमागे २ रुपयांची वाढ झाली असून, ते २२ रुपये झाले आहे. गेल्या वर्षी अर्धा लिटर दुधासाठी २० रुपये दर होता. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठीही यंदा १५० ते २०० रुपये जादा मोजावे लागत आहेत. महागाईने महिन्याच्या खर्चात ७०० ते १००० रुपयांची वाढ झाली.

एसटीच्या भाडेवाढीने गावी जाणे टाळले
एसटीची भाडेवाढीने भेरे कुटुंबीयांना कोकणात जाण्याचा बेत रद्द करावा लागला. गेल्या वर्षी एसटीचे तिकीट प्रतिव्यक्ती ३७५ रुपये होते. यंदा तिकिटाचा दर ५०० रुपयांपर्यंत वाढला आहे. खासगी बसचा दर ७०० ते १००० रुपयांच्या दरम्यान असल्याने चौघांचा प्रवासाचा खर्च प्रचंड वाढला. परिणामी गावी जाण्याचा विचार रद्द केला, असे त्यांनी सांगितले.

गावची मनिऑर्डर निम्म्याने घटली
भेरे यांच्या सासू गावी असून त्यांना घरखर्चासाठी दरमहा १५०० रुपये त्या पाठवत होत्या; मात्र महागाईची झळ गावी पाठवणाऱ्या मनिऑर्डरला बसली आहे. भेरे आता दर दोन महिन्यांनी १००० ते १५०० रुपये पाठवत असून, महागाईने त्यांना गावी निम्मे पैसे पाठवत आहेत.

भेरे यांचा मासिक खर्च 
तपशील    आताचा    पूर्वीचा
किराणा सामान    २२००    १८००
भाजीपाला व इतर खर्च    १७००    १२००

शिक्षणाचा वार्षिक खर्च
तपशील    आताचा    पूर्वीचा
शाळेची फी    ९२००    ८६००
ट्युशन फी    १८०००    १४५००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com