esakal | चिंताजनक ! नवी मुंबईत एका दिवसात 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू, जाणून घ्या रुग्णसंख्या
sakal

बोलून बातमी शोधा

navi mumbai

मृत्यू झालेल्यापैकी एक जण एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचा व्यापारी होता. नेरुळ सेक्टर 20 येथील ते रहिवाशी असून त्यांचे वय 68 वर्ष इतके होते. एपीएमसीतील कोरोनाबधित कामगाराच्या 50 वर्षीय भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

चिंताजनक ! नवी मुंबईत एका दिवसात 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू, जाणून घ्या रुग्णसंख्या

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या 4 रुग्णांचा शुक्रवारी (ता.15) मृत्यू झाला. यात 3 वृद्ध नागरिकांचा समावेश असून त्यांना आधीपासून विविध आजाराने ग्रासले होते. त्यामुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 23 पर्यंत पोहचली आहे. 

महत्वाची बातमी : '18 मे'पासून पुढे काय? कसा असेल नव्या ढंगातील लॉकडाऊन 4.0, वाचा महत्त्वाची बातमी...

नवी मुंबई शहरात शुक्रवारी 74 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या हजार पार होऊन एक हजार 48 इतकी झाली आहे.  मृत्यू झालेल्यापैकी एक जण एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचा व्यापारी होता. नेरुळ सेक्टर 20 येथील ते रहिवाशी असून त्यांचे वय 68 वर्ष इतके होते. एपीएमसीतील कोरोनाबधित कामगाराच्या 50 वर्षीय भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोपरखैरणे सेक्टर 12 इ येथील ते रहिवासी असून त्यांना गेल्या अनेक महिन्यापासून श्वसनाचा त्रास होता.  

हे ही वाचा : हृदयद्रावक ! ...आणि मुलांनी वाटेतच आपल्या बापाला गमावलं, वाचा मन सुन्न करणारी बातमी

तुर्भे सेक्टर 20 येथे राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाचा नेरुळ येथील डी. वाय पाटील रुग्णालयात मृत्यू झाला. या वृद्धांच्या पत्नीचा गेल्या महिन्यातच  मृत्यू झाला होता. काही दिवसांपासून त्यांना ताप आल्यामुळे 13 मे रोजी त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना डी. वाय पाटील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. घणसोलीतील म्हात्रे आळी येथे राहणाऱ्या 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना याआधी पासून खोकला आणि दम्याचा त्रास होता.

Death of 4 corona patients in one day in Navi Mumbai, 74 patients are positive

loading image