ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अरुण मैड यांचे निधन 

श्रीकांत खाडे
Monday, 10 August 2020

ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अंबरनाथ शाखा अध्यक्ष प्रा. अरुण मैड (73) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता. 10) पहाटे निधन झाले. प्रा. मैड यांच्या पश्‍चात पत्नी प्रा. रेखा मैड, एक मुलगा, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रा. मैड प्रकृती अस्वस्थतेमुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज पहाटे त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांचे निधन झाले. 

अंबरनाथ : ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अंबरनाथ शाखा अध्यक्ष प्रा. अरुण मैड (73) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता. 10) पहाटे निधन झाले. प्रा. मैड यांच्या पश्‍चात पत्नी प्रा. रेखा मैड, एक मुलगा, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. प्रा. मैड प्रकृती अस्वस्थतेमुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज पहाटे त्यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांचे निधन झाले. 

क्लिक करा : कोरोनाचा 'आरटीओ'लाही फटका; महसूल घटल्याने 'या' वाहनधारकांकडे वळणार मोर्चा

माध्यमिक विद्यालयातून पर्यवेक्षक महाविद्यालयात अनेक वर्षे प्राध्यापक असलेल्या प्रा. मैड यांनी शिक्षक असतानाच साहित्याची आवड जोपासली होती, अनेक जणांना त्यांनी लिहिते केले. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर "कलाकौस्तुभ' ग्रंथाचे ते संपादक होते. त्या ग्रंथाचे प्रकाशन शिवमंदिराच्या आवारात झाले होते. येथील ग्रंथाभीसरण वाचनालयाचे ते अध्यक्ष होते. याखेरीज शहरातील अनेक सामाजिक आणि शैक्षिणक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. 

काही काव्यसंग्रहांच्या प्रस्तावना आणि अंकाचे संपादन प्रा. मैड यांनी केले होते. साहित्यिक गिरीजा किर यांच्या समग्र साहित्य ग्रंथाचे संपादन त्यांनी केले होते. याशिवाय संत साहित्य, कथा, कविता, लेखन विविध पुस्तके, मासिकांमधून मुलांसाठी त्यांनी विपुल लेखन केले आहे.

क्लिक करा : रेल्वेच्या 'त्या' व्हायरल पत्राबाबत खुलासा; वाचा मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी

अंबरनाथमध्ये साहित्य चळवळ वाढीसाठी प्रा. मैड यांनी नेहमी पुढाकार घेतला होता. प्रा. मैड यांच्या निधनाने शहरातील सांस्कृतिक चळवळीचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 

------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of Literary Arun Mad