कर्तव्य बजावत असताना, वाहकाचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू. 

वृत्तसंस्था
रविवार, 11 मार्च 2018

भालचंद्र घोटे हे आज जव्हार - कसारा या बसफेरी वर कार्यरत होते. मोखाडा - खोडाळा दरम्यान देवबांध घाटात बस जात असताना, त्यांना तिव्र ह्रदय विकाराचा झटका आला. त्यात गाडीतच ते कोसळले. त्यांना तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता येथील डॉ. गौरव यांनी मृत घोषित केले

मोखाडा  -  जव्हार एस टी  आगारातील वाहक भालचंद्र महादेव घोटे ( 48 ) हे जव्हार - कसारा ह्या बसफेरी वर कार्यरत असताना, ह्रदय विकाराच्या तिव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. ते मोखाड्यातील खोडाळा गावातील रहिवासी होते. 

भालचंद्र घोटे हे आज जव्हार - कसारा या बसफेरी वर कार्यरत होते. मोखाडा - खोडाळा दरम्यान देवबांध घाटात बस जात असताना, त्यांना तिव्र ह्रदय विकाराचा झटका आला. त्यात गाडीतच ते कोसळले. त्यांना तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता येथील डॉ. गौरव यांनी मृत घोषित केले. घोटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तिन मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष हरपल्याने घोटे कुटूंब पुरते खचले आहे.

घटनेची माहिती मिळताच, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, राष्ट्रवादी काॅग्रेस चे प्रदेश कार्यकारीनी सदस्य रघुनाथ पवार यांनी घोटे कुटुंबाचे सांत्वन केले आहे. 

Web Title: death mumbai news heart attack