कचऱ्याचा ढीग कोसळून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

कुर्ला येथील कसाईवाडा भागातील डोंगरावर साठलेल्या कचऱ्याचा ढीग झोपडीवर कोसळल्यामुळे रशीद कुरेशी (वय ४८) यांचा मृत्यू झाला.

मुंबई - कुर्ला येथील कसाईवाडा भागातील डोंगरावर साठलेल्या कचऱ्याचा ढीग झोपडीवर कोसळल्यामुळे रशीद कुरेशी (वय ४८) यांचा मृत्यू झाला. झोपडपट्टीतून वर्षानुवर्षे टाकला जाणारा कचरा डोंगरावरच साठल्यामुळे ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेनंतर डोंगरावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या डोंगरावरील दरडी कोसळून यापूर्वी ११ जणांचा बळी गेला आहे. कुर्ला पूर्वेकडील दगडखाणी बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी झोपड्या उभ्या राहिल्या. या झोपड्यांची जागा चाळींनी घेतली आहे. डोंगराच्या टोकावरही मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. झोपडपट्टीत तयार होणारा कचरा डोंगरावरच टाकला जातो. अनेक वर्षांपासून साठलेला कचरा डोंगराखालील युसूफ पठाण चाळीतील एका घरावर कोसळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of one of the trash collapses