दोन रेल्वे अपघातात एकीचा मृत्यू; एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - विद्याविहार रेल्वेस्थानकाजवळ गुरुवारी (ता. 19) सकाळी रूळ ओलांडताना लोकलची धडक बसून ज्योती मुन्नालाल वर्मा (वय 17) हिचा मृत्यू झाला; तर सायन-माटुंगा दरम्यान लोकलमधून पडून तेजश्री श्रीराम वैद्य (23) गंभीर जखमी झाली. ज्योती विक्रोळी पार्कसाइट येथील रहिवासी होती. ती विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात 11 वी वाणिज्य शाखेत शिकत होती. रूळ ओलांडताना लोकलची धडक तिला बसली. तेजश्री ही सायन-माटुंग्यादरम्यान गुरुवारी धावत्या लोकलमधून पडली. ती चर्चगेट येथे परीक्षेसाठी निघाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा शोध घेतला. त्या वेळी नाल्यात पडलेली तेजश्री आढळून आली. तिला तत्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे.
Web Title: death in railway dash