पुणे बलात्कार प्रकरणात आरोपींची फाशी रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी फाशीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने दिला होता. मात्र उशीरा फाशीमुळे जगण्याच्या अधिकारावर बाधा आल्याचा दावा आरोपींनी केला होता.

मुंबई : पुण्यातील बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकाडे यांची फाशीची सजा उच्च न्यायालयाने आज रद्द केली.

राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी फाशीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने दिला होता. मात्र उशीरा फाशीमुळे जगण्याच्या अधिकारावर बाधा आल्याचा दावा आरोपींनी केला होता. उच्च न्यायालयाने फाशी रद्द करून मरेपर्यंत जन्मठेपेची सजा दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death sentence cancelled of 2 accused by high court in Pune Rape case