विजेच्या झटक्‍याने बिगाऱ्याचा मृत्यू 

विजेच्या झटक्‍याने बिगाऱ्याचा मृत्यू 

मालाड : मालाडमधील मालवणी परिसरात एका बिगारी कामगाराचा रविवारी (ता. 10) संध्याकाळी विजेच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मालवणीतील एमएचबी कॉलनी प्रवेशद्वार क्रमांक 8 येथे ही दुर्घटना घडली.

तेथे एका घरातील शौचालयाच्या टाकीचे बांधकाम सुरू असताना नौशाद मोहम्मद अली शेख (वय 23) हा तेथे बिगारी काम करत होता. त्या कामादरम्यान त्याला विजेचा झटका बसल्याने त्याचा मृत्यू झाला.

त्याला त्वरित खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तिथून त्याला लगेच कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब सर्वसाधारण पालिका रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. या संदर्भात घरमालकावर गुन्हा नोंदवून मालवणी पोलिस पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती वरिष्ष्ठ निरीक्षक जगदेव कालापाड यांनी दिली. 

web title : Death of a worker by lightning strike

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com