उपोषणाला बसलेल्या तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-तीन प्रकल्पातील वांद्रे पूर्व येथील प्रकल्पग्रस्तांपैकी 30 कुटुंबांनी घराच्या मागणीसाठी एमएमआरडीए कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलकांपैकी इब्राहिम सलीम शेख (वय 18) याचा आज सकाळी मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेट्रो-तीन प्रकल्पात वांद्रे पूर्व येथील संत ज्ञानेश्‍वर नगरमधील सुमारे 120 झोपड्या बाधित झाल्या आहेत. या झोपड्यांना उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या. यानंतर घराचे पुरावे अथवा सुनावणी न घेता रहिवाशांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला. यामधील सुमारे 90 कुटुंबीयांनी पर्यायी घरे उपलब्ध करून दिली आहेत; मात्र 30 रहिवाशांना अद्याप घरे दिली नसल्याने ते बेघर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी 20 फेबुवारीपासून एमएमआरडीए कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Death of a youth sitting on hunger strike