डेक्कन क्वीन कर्जतला थांबलीच नाही

railway
railway

नेरळ :  खंडाळा घाटातील कामामुळे प्रगती एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रगती एक्‍स्प्रेस सुरू होईपर्यंत पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्वीनला कर्जत येथे थांबा देणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले, परंतु डेक्कन क्वीन कर्जतला न थांबता ती थेट दादरला थांबली. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. 

खंडाळा घाटातील मंकी हिल ते कर्जतदरम्यान रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत; तर काहींचे मार्ग बदलले आहेत. त्यापैकी मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्‍स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे पुन्हा सुरू होईपर्यंत डेक्कन क्वीनला कर्जत स्थानकात थांबा देण्याची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारपासून (ता. 7) डेक्कन क्वीनला कर्जत येथे थांबा देण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे पुण्याहून कर्जतला जाणारे प्रवासी डेक्कन क्‍वीनमध्ये होते, परंतु डेक्कन क्‍वीन कर्जतला न थांबता थेट दादरला थांबली. काही प्रवाशांकडे कर्जतपर्यंतचे तिकीट असल्याने त्यांना दादर स्थानकात पकडण्यात आले. प्रवाशांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्याने त्यांची सुटका करण्यात आली; मात्र यामध्ये त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. 
--- 
रेल्वेचा भोंगळ कारभार 
डेक्कन क्वीन कर्जतवरून सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जाते. आज ही रेल्वे थांबणार का, याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगिलाल ओसवाल यांनी कर्जत स्थानकप्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आम्हाला कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com