मद्य परवाना नुतनीकरणाला डिसेंबर अखेरची डेडलाईन! अन्यथा परवाना रद्दची कारवाई

मद्य परवाना नुतनीकरणाला डिसेंबर अखेरची डेडलाईन! अन्यथा परवाना रद्दची कारवाई

मुंबई :  राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहिल्यांदा परवाने नुतनीकरणासाठी 15 टक्क्यांची शुल्क वाढ केली होती. त्यामध्येही कोरोनाची महामारी आल्याने मद्य विक्रेत्यांनी या शुल्क वाढीचा विरोध केला.मात्र, राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने वेळोवेळी जुन्याच दरात नूतनीकरणासाठी मुदत वाढ दिल्यानंतरही डिसेंबर अखेर नूतनीकरण न करणाऱ्या मद्य विक्रेत्यांचे परवाने रद्द होण्याची शक्यता आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाने नुतनीकरणासाठी दरवर्षी शुल्क वाढ केली जाते. त्याप्रमाणेच नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, यावर्षी कोरोनाची महामारी असल्याने अद्याप मद्य विक्रेत्यांनी परवाने नूतनीकरण केले नव्हते, त्यामुळे सुरुवातीला राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 एप्रिल पर्यंत जुन्याच दराने नूतनीकरणाची मुभा दिली, मात्र मद्य विक्री संघटनांकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, त्यानंतर उच्च न्यायालयाने पुन्हा 1 जून पर्यंत जुन्याच दरातच नूतनीकरण करता येणार असल्याचा निर्वाळा दिला होता.

मात्र, अद्याप अनेक मद्य विक्रेत्यांनी परवाने नूतनीकरण केले नसल्याने अशा परवानेधारकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाने रद्दची कारवाई करण्याची शक्यता आहे. 

राज्य सरकार दिलासा देण्याच्या तयारीत

दरवर्षी मद्य विक्री परवाना नुतनीकरणासाठी काही टक्के शुल्क काढ केली जाते. मात्र,कोरोनाकाळामुळे मद्य विक्री प्रचंड थंडावली आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात अनेकांनी परवाने नूतनीकरण केले नाही. ऑक्टोबर महिन्यापर्यंत नुतनीकरणातून 716 कोटीचा महसूल प्राप्त झाला होता. तर 193 कोटी रुपयांच्या महसुलाची प्रतीक्षा असल्याचे तत्कालीन  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.  मात्र, आता  मद्य विक्री संघटनांनी परवाना नुतनीकरणातुन विविध सवलत देण्याच्या मागण्या राज्य सरकारकडे केल्याने यासंदर्भातील चर्चा लवकरच कॅबिनेट बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

कोरोनाकाळामुळे मद्य विक्री बराच वेळ बंद होती. त्यामुळे मद्य विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशात पहिल्यांदा 15 टक्क्यांची नूतनीकरणाचा शुल्क वाढ केले आहे. त्यामुळे शुल्क वाढ कमी करावी आणि जेवढ्या दिवस मद्य विक्रीसाठी दुकाने उघडे होती त्याप्रमाणेच नूतनीकरणाचा शुल्क आकारावे अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
- शिवानंद शेट्टी,
अध्यक्ष, आहार असोशियशन

December deadline for liquor license renewal! Otherwise license revocation action

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com