दुबईत नोकरीच्या प्रलोभनाने गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

मुंबई : दुबईत नोकरी देण्याची जाहिरात एका इंग्रजी वृत्तपत्रात देऊन अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद महमूद ऊर्फ युनूस अब्दुल कादर (वय 35) याला जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली. तो मूळचा हैदराबादचा आहे.

मुंबई : दुबईत नोकरी देण्याची जाहिरात एका इंग्रजी वृत्तपत्रात देऊन अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद महमूद ऊर्फ युनूस अब्दुल कादर (वय 35) याला जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली. तो मूळचा हैदराबादचा आहे.

दुबई रोड ट्रान्स्पोर्ट ऍथॉरिटीला चालक पाहिजे, अशी जाहिरात एका इंग्रजी वर्तमानपत्रात आली होती. ती वाचून तक्रारदार तरुणाने ऑनलाइन अर्ज केला होता. काही दिवसांनी त्याला नोकरी मिळाल्याचा संदेश आला. त्यात नोकरीचा करारनामा करण्यासाठी ठराविक रक्कम भरण्यास सांगितले होते.

संदेश आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता हैदराबाद येथील बॅंक खात्यात साठ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदार तरुणाने रक्कम बॅंक खात्यावर जमा केली. त्यानंतर त्याला ऑफर लेटर आले नाही. अखेर त्याने संदेश आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद असल्याचा आढळला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणाने जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

Web Title: deception by enticing for dubai job