येत्या दोन दिवसात अंतिम परीक्षाबाबत निर्णय येणार, उदय सामंत यांची माहिती

तेजस वाघमारे
Wednesday, 2 September 2020

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. येत्या दोन दिवसांत आम्ही परीक्षांबाबत निर्णय घेणार असून सध्या कुलगुरूंशी बैठक सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं.

मुंबईः उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात ही भेट घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची परीक्षा संदर्भातील भावना आणि शासनाची भूमिका याबाबत राज्यपालांची चर्चा करण्यात आली. ज्या बैठका सुरु आहे, त्याबाबतची माहिती राज्यपालांनी दिली असल्याचं सामंत यांनी सांगितलं. 

यावेळी विद्यार्थ्यांची मागणी देखील मांडली. येत्या दोन दिवसांत आम्ही परीक्षांबाबत निर्णय घेणार असून सध्या कुलगुरूंशी बैठक सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं.  आज कुलगुरूंसोबत तीन टप्प्यात बैठक होणार आहे. त्यात एक ११ वाजता पार पडली.  १ वाजता आणखी एक बैठक आयोजित करण्यात आली. त्यानंतर उदय सामंत आणि कुलगुरूची ४ वाजता पुन्हा एक बैठक होणार असल्याचं समजतंय. राज्यपाल यांना कुलगुरूचे म्हणणं काय आहे ? विद्यार्थ्यांच्या याबाबत म्हणणं काय आहे याबाबतची चर्चा झाली त्याबाबत माहिती दिली.

 

अधिक वाचाः  मुंबईत चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कुलगुरू जे निर्णय घेतायेत ते त्यांना घेऊ द्यावेत त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल असे राज्यपाल म्हणाले असल्याचं सामंत यांनी सांगितलं. तसंच परीक्षा साध्या सोप्या पद्धतीनं कशा घेता येतील त्याबाबत विचार केला पाहिजे, असंही ते म्हणालेत.

उद्या 4 वाजता राज्यपाल, कुलगुरू आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मिळून एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होईल आणि त्यानंतर अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकीत परीक्षेबाबात निर्णय घेऊन परीक्षा कशी घ्यावी, कधी घ्यावी याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणालेत.

हेही वाचाः थोडी लक्षणं दिसली तरी लगेच उपचार करा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

यावेळी राज्यमंत्री  प्राजक्त आणि ए सी एस जलोटा हे उपस्थित होते. परीक्षा सोप्या पद्धतीने व्हाव्या हीच अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे.

(संपादनः पूजा विचारे)

A decision on the final examination will be taken in the next two days, informed Uday Samant


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A decision on the final examination will be taken in the next two days, informed Uday Samant