मद्य विक्रीच्या महसुलात घट, 19 हजार 225 कोटीच्या महसुली उत्पन्नाचे लक्ष गाठणे कठीण 

मद्य विक्रीच्या महसुलात घट, 19 हजार 225 कोटीच्या महसुली उत्पन्नाचे लक्ष गाठणे कठीण 

मुंबई, ता. 21 : कोरोनाच्या महामारीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग आपल्या महसुली उत्पन्नाच्या उद्दिष्टापासून दूर राहण्याची शक्‍यता आहे. या आर्थिक वर्षात 19,225 कोटी रुपये महसुल मिळवण्याचे उद्दीष्ट ठेवले असताना आतापर्यंत नऊ महिन्यात 50 टक्के उद्दीष्ट गाठण्यासाठी सुद्धा कसरत करावी लागत आहे. त्यामूळे मार्च अखेरपर्यंत शिल्लक उद्दिष्ट गाठणे कठीण दिसत असल्याने यावर्षी मद्य विक्रीच्या महसुली उत्पन्नाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

कोरोनाच्या माहामारीमूळे 1 एप्रिलपासून सुरू झालेले नविन आर्थिक वर्ष लॉकडाऊनमध्येच गेले आहे. मद्यविक्री बंद असल्याने शासनाच्या मार्फत नवीन मद्यउत्पादन आणि विक्री झाली नाही. त्यानंतर अनलॉकझाल्याने मे महिन्यापासून काही प्रमाणात विदेशी मद्यांची दुकाने उघडण्यात आले, मात्र, कोरोनाची लाट सुरूच असल्याने मद्य विक्रीत घट झाली, त्याचा परिणाम उत्पादन शुल्कवर पडल्याने गेल्या नऊ महिन्यात 50 टक्के महसुलाची कमाई सुद्धा झाली नाही. 

त्यामुळे राहिलेल्या तिन महिन्यात आता 10 हजार 218 कोटीचा महसुल गोळा करण्याची कसरत राज्य उत्पादन शुल्क विभागाला करावी लागणार आहे. मात्र, तिन महिन्यात यावर्षीचे महसुलाचे लक्ष पुर्ण होणे कठीण असल्याचे दिसून येत आहे. 

मद्यविक्री परवाने नुतनीकरणासाठी यावर्षी पहिल्यांदाच 15 टक्के शुल्क वाढ केली आहे. त्याचा विरोध करत मद्य विक्रेते संघंटनांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासोबतच राज्य सरकारला शुल्क वाढीतून दिलासा आणि दुकाने सुरू असलेल्या दिवसाचांच शुल्क आकारण्याची मागणी केली आहे. त्यामूळे परवाने नुतनीकरणाच्या 15 टक्के शुल्क वाढीतून येणारे महसूल सुद्धा घटण्याची शक्‍यता असल्याचे दिसून येत आहे.

Decline in liquor sales revenue target of Rs 19 thousand 225 crore difficult to achieve

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com