औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्याचे काम सुरु करण्यात दिरंगाई

rasayni
rasayni

रसायनी (रायगड) - पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे कामाची दोन महिन्यापुर्वी निविदा उघडण्यात आली आहे. तसेच बांधकाचा ठेका देण्यात आला आहे. मात्र बांधकामाला अद्याप सुरवात झाली नसल्यामुळे कारखानदांर नाराजी व्यक्त करत आहे. 

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील श्री सिध्देश्वरी ते बाँम्बे डाईन्ग लिमिटेड या मुख्य रस्त्यावरून औद्योगिक क्षेत्रातील, क्षेत्रा बाहेरील कारखान्यात तसेच वडगाव, माझगाव, इसांबे, या ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावाकडे जाणा-या आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील श्री सिध्देश्वरी ते चावणे सर्कल मुख्य रस्त्यावरून औद्योगिक क्षेत्रातील आणि जांभिवली, चावणे, कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दितील गावांकडे जाणा-या वाहनांची संख्या मागील सहा सात वर्षात खुप वाढली आहे. त्यामुळे पावसाळ्यात लवकरच या रस्त्यांवर खड्डे पडुन जाताना हाल होऊ लागले. कारखानदारांनी क्षेत्रातील मुख्य रस्ते  काँक्रीटीकरणात बांधण्यात यावा आशी मागणी केली. तसेच कारखानदारांच्या आसोशिएशने मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्ते काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला आहे.  काँक्रीटीकरणाचे कामाचा ठेका देण्यात आला असल्याचे एमआयडीसीचे उप अभियंता राजेंद्र बेलगमवार यांनी सांगितले. मात्र बांधकामाला सुरवात झाली नसल्यामुळे कारखानदांर नाराजी व्यक्त करत आहे. 

तसेच 12 डिसेंबर 18 रोजी जिल्हा उद्योग मित्राच्या बैठकीत जिल्हाधीकारी यांच्याकडे रस्त्याच्या काँक्रीटीकरण काम सुरू करण्यात मागणी बाबतचा मुद्दा पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशने उपस्थित केला होता. त्यावेळी निविदा उघडण्यात आल्यानंतर  जिल्हाधीकारी यांनी एक महिन्यात काम सुरू करण्याचे निर्देश एमआयडीसीला दिले होते, अजुन काम सुरू करण्यासाठी काहीच हालचाली दिसत नाही असे कारखानदांरानी सांगितले. 

काँक्रीटीकरण कामाची निविदा उघडुन दोन महिने उलटले, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही. वेळेत काम सुरू झाले असते तर क्षेत्रातील श्री सिध्देश्वरी ते बाँम्बे डाईन्ग पर्यंत चौपदरी रस्ता आहे. त्यातील एक दुपदरी रस्त्याचे  काम पावसाळ्या पुर्वी पुर्ण करणे शक्य होते. आता उशीरा काम सुरू केले तर याही वर्षी पावसाळ्यात खड्डयांमुळे जाताना हाल होणार काय असे वाटते. 
- चंद्रशेखर शेंडे, महाव्यावस्थापक, बाँम्बे डाईन्ग लिमिटेड, पाताळगंगा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com