नवी मुंबईतील विकासकामांचा दर्जा घसरला?

नवी मुंबईतील विकासकामांचा दर्जा घसरला?
नवी मुंबईतील विकासकामांचा दर्जा घसरला?

नवी मुंबई : पायाभूत सुविधांच्या जुन्याच कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा मुदतवाढ देणे, निविदा न काढता दरपत्रकांवरून साहित्य खरेदी करणे, प्रयोगशाळांचे प्रमाणपत्र न घेता देयके चुकती करणे व कार्यादेश देण्यास विलंब, अशा अनेक आक्षेपांमुळे शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा घसरण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. लेखापरीक्षण विभागाने स्थायी समितीमध्ये सादर केलेल्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात तब्बल दीड हजार विविध आक्षेप नोंदवले आहेत. 
  
सीव्हीसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार निविदेत सादर केलेल्या दराची कालमर्यादा संपल्यानंतर पुन्हा त्याच कामासाठी, अथवा दुसऱ्या कामासाठी नवीन निविदा राबवण्याचा नियम आहे. मात्र, तसे न करता गेल्या तीन ते चार वर्षांपासून महापालिका प्रशासनातर्फे जुन्या कंत्राटदारांना आधीच्याच दरांनुसार पुढील कामे करू दिली जात असल्याचे लेखापरीक्षण अहवालातून समोर आले आहे. महापालिकेच्या लेखा परीक्षण विभागाने नुकत्याच झालेल्या स्थायी समिती कामकाज पटलावरील तपासलेल्या हिशेबाचा अहवाल सादर केला आहे. मार्च २०१९ ते जुलै २०१९ अशा सहा महिन्यांच्या कालावधीदरम्यान तपासलेल्या हिशेबावरील अहवाल सादर केला आहे. लेखापरीक्षणातील अहवालाचा अभ्यास करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळ मागितला आहे. 

मात्र, अहवालात सर्वाधिक परिमंडळ एकच्या कामांवर तब्बल ३६८ आक्षेप नोंदवण्यात आले आहेत, तर महापालिकेच्या लेखावित्त विभागानेही मुद्रांक शुल्क अधिनियम २०१५ नुसार मुद्रांक शुल्क कमी घेतल्याचा आक्षेप नोंदवला आहे. सेंट्रल पार्क, तुर्भे जनता मार्केट रस्ता सुधारणा या कामांमध्ये विलंबाने काम झाल्यावरही ७.५ टक्के दराने दंडात्मक शुल्काची वसुली केलेली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

चढ्या दराने बांधकाम
लेखापरीक्षण अहवालात चढ्या दराने बांधकाम करणे व सरकारमान्य प्रयोगशाळेची चाचणी न करता साहित्य खरेदी करणे व देयके अदा करणे असे गंभीर आक्षेप अभियांत्रिकी व आरोग्य विभागातील कामांवर नोंदवले आहेत. तुर्भे एमआयडीसी व घणसोली सावली गाव, सेंट्रल पार्क विकसित करणे या कामांत अंदाजपत्रक दरापेक्षा जास्त दराने विकास कामे मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नोंदवलेले आक्षेप
- नवीन निविदा प्रक्रिया न राबवता मागील दरानुसार मुदतवाढ देणे.
- निविदा प्रक्रिया न राबवता दरपत्रकानुसार खरेदी करून साहित्य खरेदी करणे.
- प्रशासकीय मंजुरीनंतर विलंबाने कार्यादेश देणे.
- विकासकामांचे तुकडे करणे.
- निविदा प्रक्रिया संदर्भात विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करणे.
- काही ठिकाणी कामांना कार्योत्तर मंजुरी घ्यायची
- कार विमा उशिरा काढणे
- कार्यदेशात नमूद केलेल्या कालावधी व्यतिरिक्त कामांना मुदतवाढ देणे
- ज्यादा आणि अतिरिक्त बाबींवरील खर्च सक्षम प्राधिकार्याची मान्यता न घेता प्रदान करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com