मानकर यांच्या जामिनाच्या सुनावणीस पुन्हा नकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील तिसऱ्या खंडपीठाने नकार दिला आहे.

मुंबई - पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील तिसऱ्या खंडपीठाने नकार दिला आहे.

न्या. प्रकाश नाईक यांनी बुधवारी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. या आधी न्या. अजय गडकरी आणि न्या. साधना जाधव यांनीही या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता मानकरांना पुन्हा नव्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करावी लागेल.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात दीपक मानकर यांचे नाव चर्चेत आले होते. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्यासह दीपक मानकर अशा एकूण पाच जणांना मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. या प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू करताच मानकर यांच्यासह कर्नाटकी यांनीही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे.

Web Title: deepak mankar bell result high court