`भाजपचा पराभव करणार`

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - वाल्मीकी समाज हातात झाडू घेऊन शहराची सफाई करणारा आहे. या समाजाला शिवसेनेने सन्मानाने राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे १० पालिका निवडणुकीत समाजाने शिवसेनेला जाहीर समर्थन दिले आहे. आता हाच वाल्मीकी समाज भाजपचा पराभव करणार असल्याचे वाल्मीकी समाजाचे राष्ट्रीय नेते आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चरणसिंह टाक यांनी उल्हासनगरमधील शिवसेना मेळाव्यात सांगितले.

वाल्मीकी समाजाचा राज्यातील १० पालिका निवडणुकीत पाठिंबा मिळाल्याने भाजपच्या पायाखालील जमीन सरकली आहे. त्यांचा पराभव नक्की आहे. शिवसेनेच्या छत्रछायेखाली या समाजाची उन्नती होईल, असा आशावाद गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला. टाक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर समाजात विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Defeat BJP