प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मोखाड्यात मतदान यंत्रे पोहोचण्यास उशीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

मोखाडा : मोखाडा तालुक्यात पालघर लोकसभा पोटनिवडणूकीच्या, मतदान प्रकियेला सर्वच ठिकाणी अडखळत सुरूवात झाली. तालुक्यातील खोडाळा, नाशेरा, पाथर्डी, बोटोशी, किनिस्ते, दुधगांव, वारघडपाडा , चिकनपाडा आणि ब्राम्हणगांव याठिकाणी मतदान मशीन बंद पडल्याने, मतदान प्रक्रिया थांबली होती. काही ठिकाणी मशिन ऊशिरा पोहोचल्या नंतर, मतदान प्रक्रिया सुरू झाली. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे, पाथर्डी गावात 11 तर नाशेरा गावात दुपारी 1 वाजुन 14 मिनीटांनी मतदान सुरू झाले परंतु दोन मतदान झाल्यानंतर पुन्हा मशीन बंद पडल्याने शेकडो मतदारांना मतदानाविना, घरी परतावे लागले आहे.

येथे 579 मतदार आहेत. तथापी , दुपार नंतर पुन्हा तालुक्यातील अनेक भागातुन मशीन बंद पडल्याने, मतदान प्रक्रिया थांबल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

सुर्य प्रकाश लागताच मशीन बंद पडते -
मतदान प्रक्रियेत नव्याने, ठेवण्यात आलेल्या मशीनला सूर्य प्रकाश लागताच मशीन बंद पडत असल्याचे, नाशेरा येथील मतदान केंद्राध्यक्ष नारायण ओझरे यांनी सांगितले आहे. तसेच या मशीन 10  वेळा तपासण्यात आल्याचे वरिष्ठांनी, मशीन ताब्यात घेताना सांगितले आहे. त्यामुळे मशीन तशाच अवस्थेत ताब्यात घ्याव्या लागल्या आहेत. 

मोखाडा तालुक्याला केवळ 4 पर्यायी मशीन
मोखाडा तालुक्यात 77   मतदान केंद्र आहेत. तसेच हा तालुका डोंगर दऱ्यात विस्तीर्ण पसरलेल्या मोखाडा तालुक्याला केवळ 4 पर्यायी मशीन दिल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी मशिन बंद पडल्याने स्थानिक प्रशासनाची पाचावर धारण झाली होती. दरम्यान, मशीन दुरूस्ती करणारे तंत्रज्ञ ही कमी असल्याने, मतदान प्रकियेचा पुरता बोजवारा उडाला आहे. 

Web Title: delay to reach voting machine in mokhada due to bad administration