नजरचुकीने ७० लाखांची जादा रक्‍कम वितरित

Money
Money

मुंबई - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल)कडून तांत्रिक अडचणींमुळे ७० लाख रुपयांची जादा रक्कम महाविद्यालयांना वितरित झाली आहे. ही रक्कम परत करण्यासाठी सेलने २९७ महाविद्यालयांना वारंवार रक्कम परत करण्याची सूचना केली आहे. यानंतरही संस्थाचालकांकडून ही रक्‍कम परत करण्याकडे काणाडोळा करण्यात येत आहे. या संस्थांची यादी सेलने प्रसिद्ध केली असून, संस्थांना अतिरिक्त रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सीईटी सेलमार्फत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यापैकी तंत्रशिक्षणांतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या संस्थांना प्रवेश निश्‍चिती शुल्काची रक्कम सीईटी सेलकडून देण्यात येणार होती.

त्यानुसार सेलने ही रक्कम महाविद्यालयांकडे सुपूर्त केली. परंतु सीईटी सेलमधील अधिकाऱ्यांच्या नजरचुकीने अनेक महाविद्यालयांना अधिक रक्कम वितरित झाली. सेलकडून २९७ महाविद्यालयांना अधिक रक्कम देण्यात आली आहे. यामध्ये काही संस्थांची रक्कम एक हजार ते काही संस्थांना दीड लाखांपर्यंत अधिकची रक्कम दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com