esakal | अयोध्येत बुद्ध मंदिरासाठीही भूखंड द्या, 'या' मोठ्या केंद्रीय मंत्र्याने केली मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

अयोध्येत बुद्ध मंदिरासाठीही भूखंड द्या, 'या' मोठ्या केंद्रीय मंत्र्याने केली मागणी 

अयोध्येच्या ऐतिहासिक राम मंदिर आणि बाबरी मशिद यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं काही दिवसांपूर्वी आपला निर्णय दिला आहे

अयोध्येत बुद्ध मंदिरासाठीही भूखंड द्या, 'या' मोठ्या केंद्रीय मंत्र्याने केली मागणी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अयोध्येच्या ऐतिहासिक राम मंदिर आणि बाबरी मशिद यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टानं काही दिवसांपूर्वी आपला निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार राम मंदिरासाठी काही भूखंड तर मशिदीसाठी काही भूखंड वाटून देण्यात आला होता.  राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनी यात उडी घेतली आहे. अयोध्येत बुद्ध मंदिरासाठीही भूखंड  द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

असा असेल उद्याचा मेगाब्लाॅक

अयोद्धेच्या जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसंच मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा देण्यात येणार आहे. मात्र आता रामदास आठवले यांनी वेगळीच मागणी केली आहे.

महत्त्वाची बातमी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सीएए संदर्भात भूमिका केली स्पष्ट

बुद्ध मंदिर उभारण्यासाठी अयोध्येत २० एकर जमीन देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही भेटणार आहेत.

नक्की काय आहे आठवलेंची मागणी

राम मंदिर आणि मशिदीप्रमाणेच बुद्ध मंदिरांसाठी सरकारनं अयोध्येत २० एकर भूखंड द्यावा आणि त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही भेटणार आहेत. जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही अयोध्येत जमीन घेऊ आणि ट्रस्ट स्थापन करून बुद्ध मंदिर उभारू असं इशाराही रामदास आठवले यांनी दिलाय. दरम्यान रामदास आठवलेंच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळात चांगलच आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.केंद्र सरकारनं राम मंदिरांसाठी नुकतंच ट्रस्ट स्थापन केलं आहे आणि काही दिवसांतच राम मंदिराचं भूमी पूजनही होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी अयोध्येत बुद्ध मंदिराची मागणी केली आहे. आता रामदास आठवलेंच्या या मागणीला केंद्र सरकारकडून आणि उत्तर प्रदेश सरकारकडून किती प्रतिसाद मिळतो हेच बघणं महत्वाचं असणार आहे. 

web title : Demand Buddhist Temple in Ayodhya, This Big Union Minister Demands

loading image