अलिबाग-मांडवा-रेवस रस्ता चौपदरी करण्याची मागणी; रो-रोमधून येणाऱ्या वाहनामुळे कोंडी

अलिबाग-मांडवा-रेवस रस्ता चौपदरी करण्याची मागणी; रो-रोमधून येणाऱ्या वाहनामुळे कोंडी

अलिबाग  : मांडवा ते मुंबई रो-रो सेवा आणि लवकरच होऊ घातलेली रेवस-करंजा रो-रो सेवा यांच्यामुळे वाढणारी वाहतूक कोंडी दूर व्हावी. यासाठी अलिबाग-मांडवा-रेवस रस्ता चौपदरी करण्याची आवश्‍यकता आहे, अशी मागणी रायगड जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. प्रवीण मधुकर ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बांधकाममंत्री अशोक चव्हाण व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे केली आहे. हे रूंदीकरण करताना जुन्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात यावे. जेणेकरून नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करता येईल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असल्याने सरकारने त्या बाबीचाही प्राधान्याने विचार करावा, अशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे. 

शनिवार, रविवारी येणाऱ्या वाहनांमुळे चोंढी, वायशेत, किहीम येथे वाहतूक कोंडी होत असते. भविष्यात ही कोंडी वाढण्याची शक्‍यता जास्त आहे. आताच या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नजिकच्या काळात अलिबाग-मांडवा प्रवास, जो आज 30 मिनिटांचा आहे, तो दीड दोन तासांवर जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या मार्गाचे रस्तारुंदीकरण अनिवार्य आहे. हे रुंदीकरण करताना जुन्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात यावे. जेणेकरून नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करता येईल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मांडवा ते मुंबई रो-रो सेवा व लवरकच सुरू होणारी रेवस-करंजा रो-रो सेवा यांच्यामुळे वाढणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अलिबाग ते मांडवा ते रेवस रस्ता चौपदरी करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशी विनंती ठाकूर यांनी केली आहे. 

रो-रोमुळे वेळ, इंधनाची बचत 
भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर रस्तामार्गे गेल्यास 109 किलोमीटर आहे. या प्रवासासाठी सुमारे तीन तास लागतात; परंतु रो-रो पॅक्‍स फेरीसेवेद्वारे जलमार्गाने प्रवास केल्यामुळे केवळ तासाभरात हे अंतर पार करता येते. रो-रो पॅक्‍स सेवेमुळे प्रवासाचा वेळ तसेच इंधन खर्चात बचत होत आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरातील वाहतुकीची कोंडीही कमी होण्यास मदत होऊन पर्यटनालाही चालना मिळत आहे. 

रस्ता रुंदीकरण लालफितीत 
मुंबईतील भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो-रो पॅक्‍स फेरीसेवा सुरू झाली आहे; तसेच करंजा ते रेवस रो-रो सेवा यावर्षी सुरू होण्यासाठी मेरीटाईम बोर्डाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मांडवा ते अलिबाग या 21 किलोमीटर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्च 2020 मध्ये विधान भवनात झालेल्या बैठकीत दिले होते. रस्ता रुंदीकरणाच्या कामातील अडचणी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाने तातडीने सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या होत्या. परंतु याबाबत अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही, असे ठाकूर यांनी पत्रात नमूद केले आहे. 

Demand for four laning of Alibag Mandwa Rewas road Congestion due to vehicle coming from Ro Ro

------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com