दिवासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी

संजीत वायंगणकर
सोमवार, 16 जुलै 2018

डोंबिवली- दिवा व लगतच्या ग्रामीण भागाला सोयीचे होईल असे नवीन पोलीस ठाणे उभारण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून मागणी केली. झपाट्याने वाढत असलेले दिवा हे ठाण्याचे उपनगर मध्य रेल्वेचे महत्वाचे जंक्शन सुध्दा आहे. दिवा शहराची लोकसंख्या तीन लाखाच्या वर गेलेली आहे तसेच दिवा शहरास लागूनच साबेगांव, आगासन, बेतवडे, म्हातार्डी, दातीवली व इतर ग्रामीण परिसर येतात. या विभागाकरिता स्वतंत्र पोलीस स्टेशन नसल्यामुळे गुन्हेगारांचे फावत आहे.

डोंबिवली- दिवा व लगतच्या ग्रामीण भागाला सोयीचे होईल असे नवीन पोलीस ठाणे उभारण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदार सुभाष भोईर यांनी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा मांडून मागणी केली. झपाट्याने वाढत असलेले दिवा हे ठाण्याचे उपनगर मध्य रेल्वेचे महत्वाचे जंक्शन सुध्दा आहे. दिवा शहराची लोकसंख्या तीन लाखाच्या वर गेलेली आहे तसेच दिवा शहरास लागूनच साबेगांव, आगासन, बेतवडे, म्हातार्डी, दातीवली व इतर ग्रामीण परिसर येतात. या विभागाकरिता स्वतंत्र पोलीस स्टेशन नसल्यामुळे गुन्हेगारांचे फावत आहे. दिवा विभागाकरिता स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी आज नागपूर अधिवेशनात आमदार सुभाष भोईर यांनी  केली. 

दिवा शहराच्या लोकसंख्येत इतर राज्यातील नागरीकांची वस्तीही सातत्याने  वाढत आहे. त्यामुळे गेल्या कांही वर्षापासून दिवा शहर व आपसापच्या ग्रामीण परिसरातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत चालले आहे. दिवा विभागाला मुंब्रा पोलीस स्टेशनच्या सीमाक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहे. दिवा येथे मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत फक्त एकच पोलीस चौकी असून तेथे दिवस व रात्री फक्त दोन पोलीस कर्मचारी असतात. वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढत चाललेली गुन्हेगारी यांस आळा घालण्याकरिता दोन पोलीस कर्मचारी अपूरे पडत आहेत. दिवा परिसरातील नागरीकांना मुंब्रा येथे पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपली तक्रार द्यावी लागते. दिवा ते मुंब्रा या दुरच्या अंतरामुळे येथील गुन्हेगारांचे फावते व पोलीस कुमक पोहचण्याआधीच गुन्हेगार पसार होतात. या सगळ्या गोष्टीमुळे स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या सर्व परिस्थितीमुळे दिवा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन असणे ही काळाची अत्यंत गरज झाली आहे.याबाबत सातत्याने मागणी करुनही अद्यापपर्यंत दिवा विभागाकरीता स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्यात आलेले नाही. त्यामुळे  दिवा विभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्यासंदर्भात आमदार सुभाष भोईर यांनी औचित्याचा मुद्दा मांडला.

Web Title: Demand for independent police station for diva