उमेदवारांसाठी सोसायट्यांची डिमांड लिस्ट!

उमेदवारांसाठी सोसायट्यांची डिमांड लिस्ट!
उमेदवारांसाठी सोसायट्यांची डिमांड लिस्ट!

मुंबई : निवडणुकीच्या निमित्ताने दारोदारी प्रचाराला येणाऱ्या उमेदवारांसाठी सोसायट्यांनीही आपली ‘डिमांड लिस्ट’ तयार केली असून रहिवाशांच्या संख्येनुसार मागण्या करण्यात येत आहेत. पाणीपट्टी भरण्यापासून परिसरात पेव्हर ब्लॉक लावण्याबरोबरच कुंपण भिंत बांधून देण्यासारख्या मागण्या केल्या जात आहेत. दुसरीकडे उमेदवारांकडून पाच वर्षांत सोसायट्यांसाठी त्यांनी केलेल्या कामांची आठवण करून मतांचा जोगवा मागितला जात आहे.

दक्षिण मुंबईत वाड्या आणि उपनगरांत सोसायट्या एकगठ्ठा मतांचे केंद्र असते. त्यामुळे सर्वच पक्षांकडून अशा मतदारांवर बारीक लक्ष ठेवले जाते. अशी संधी मतदारांकडूनही कॅश केली जात आहे. दक्षिण मुंबईतील वाड्यांमध्ये १०० हून अधिक कुटुंबे राहतात. उपनगरांतील काही सोसायट्या २०० उंबऱ्यांच्या पुढे आहे. त्यामुळे अशा मोठ्या सोसायट्या आणि वाड्यांवर उमेदवारांचे विशेष लक्ष असते. म्हणूनच मतदारांकडून आपल्या मागण्यांची यादी पुढे केली जात आहे.

मतदारांकडून मागण्या येणारच याची खात्री असल्याने विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षांत संबंधित सोसायट्यांबरोबरच परिसरात केलेल्या विकासकामांची यादी तयार केली आहे. नगरसेवक आणि पदाधिकारी ती यादी प्रत्येक सोसासाटीतील कर्त्या पुरुषाला वाचून दाखवत आहेत. नवखे उमेदवार मात्र मतदारांच्या सर्व अटी मान्य करण्याला प्राधान्य देत आहेत. 

पुनर्विकासाचीही चर्चा 
मुंबईतील अनेक चाळी आणि सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे पुनर्विकास लांबला आहे. उपनगरातील सोसायट्यांसाठी अभिहस्तांतरण हा वादाचा मुद्दा आहे. शेकडो सोसायट्यांचे अभिहस्तांतरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासनही काही उमेदवारांकडून घेतले जात आहे, असे एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com