गुन्हेगारीला लगाम घालण्याची मनसेची पोलीस उपायुक्तांकडे मागणी

दिनेश गोगी
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : खून, अपहरण, मारामाऱ्या, दरोडे, चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील दागिने खेचून पळ काढणे, स्कायवॉक वरील लूटमार आदी वाढत्या घटनांनी आणि होत असलेल्या गुन्हेगारीमुळे उल्हासनगरकर भयभीत झाले आहेत. क्षुल्लक किरकोळ कारणावरून गुन्हेगार प्रवृत्तीचे टोकाचे पाऊल उचलत असल्याने नागरिकांत पूर्णतः असुरक्षितता पसरली आहे. यावर लक्ष वेधणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत व अतिसंवेदनशील विशेषतः रात्री 10 नंतर सातत्याने पोलिसांच्या गस्तीची सुरवात करावी अशी मागणी पोलीस उपायुक्त मनोज शेवाळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

यावेळी मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे, मनविसे शहर अध्यक्ष मनोज शेलार,उपाध्यक्ष ऍड.अनिल जाधव, सचिन बेंडके, सचिव शालीग्राम सोनवणे,मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार, तन्मय देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते . 

काही संवेदनशील भागासोबत बऱ्याच ठिकाणी पोलीस चौक्या बांधण्यात आल्या आहेत.मात्र त्या बंद राहत असल्याने चौकातच तरुण मंडळी धिंगाणा घालत असून त्यातून एखादी अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.ते पाहता बंद असलेल्या चौक्या सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा यावरही शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी पोलीस उपायुक्त मनोज शेवाळे यांचे लक्ष वेधले.लवकरच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकां सोबत बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असे आश्वासन शेवाळे यांनी मनसेला दिले.

Web Title: demand by MNS to control increasing crime in ulhasnagar