वृत्तपत्र विक्रेत्यांना फेरीवाला क्षेत्रातून वगळ्याची मागणी (व्हिडीओ)

Demand for newspaper vendors excluding from the hawker area
Demand for newspaper vendors excluding from the hawker area

ठाणे : फेरीवाला हटाव मोहीम राबवताना वृत्तपत्र विक्रेत्यांना फेरीवाला समजून त्यांचे स्टॉल तोडू नयेत, त्यांच्या व्यवसायाला संरक्षण द्यावे, या आमदार संजय केळकर यांच्या मागणीला नगरविकास विभागाने सकारात्मकता दर्शवून स्थानिक स्वराज्य संस्थांना तशा सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. 

ठाण्यात काही दिवसांपूर्वी राबवण्यात आलेल्या फेरीवाला हटाव मोहिमेत फेरीवाल्यांसह एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवरही कारवाई करण्यात आली होती. या घटनेनंतर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनांनी आंदोलन करत निषेधही व्यक्त केला. आमदार केळकर यांनी अधिवेशनात पुन्हा एकदा वृत्तपत्र विक्रेत्यांची बाजू मांडून त्यांच्या व्यवसायाला संरक्षण देण्याची जोरदार मागणी केली. राज्यातील वृत्तपत्र विक्रेते वर्षानुवर्षे हा व्यवसाय करत आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जगवण्याचे काम हा घटक करीत आहे. मात्र फेरीवाला हटाव मोहीम राबवताना स्थानिक स्वराज्य संस्था वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवरही कारवाई करतात. वास्तविक हा व्यवसाय फेरीवाला क्षेत्रात मोडू नये.

मागणी आमदार केळकर यांनी राज्यमंत्री योगेश सागर यांच्याकडे केली.
या प्रकरणी राज्यमंत्री सागर यांनी संबंधितांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ठाण्यासह राज्यातील हजारो वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com