जकात नाक्‍यांच्या जागा संरक्षित करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - दोन महिन्यांत जकात बंद होणार असल्याने जकात नाके बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे या नाक्‍यांच्या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी पाहणी करावी, अशी मागणी भाजपने बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केली.

मुंबईत पाच जकात नाके आहेत. जकातीतून पालिकेला दरवर्षी सुमारे सात हजार कोटींचे उत्पन्न मिळते. वस्तू सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर हे उत्पन्न मिळणार नाही. जकात हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. या नाक्‍यांची शेकडो एकर जमीन आहे. ही जमीन पालिकेच्या मालकीची असून जकात रद्द होऊन जीएसटी लागू झाल्यास त्या रिकाम्या जागांवर अतिक्रमणे होतील, अशी भीती भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केली. त्यामुळे वाहतुकीच्या सुविधांसाठी त्या जमिनी वापराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. जकात चुकवून पालिकेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केली.

Web Title: demand for octroi naka place secure