वज्रेश्वरी रस्त्याला 90 दिवसात तडे, रस्ता चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध असे वज्रेश्वरी देवस्थान मधून जाणारा राज्य मार्ग क्र 81 मध्ये वज्रेश्वरीत सिमेंट रस्ता अवघा 90 दिवसात तडे जाऊन खराब झाला. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीही चौकशी केली नाही. यामुळे सांबांधित विभागाच्या ठाणें येथील कार्यालयात बैठे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संघर्ष अभियानचे येथील अध्यक्ष सुनील देवरे यांनी दिला आहे.

एम.एम.आर.डी.ए. मार्फत एकूण रस्त्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले होते. सदर रस्त्याचे ठेका क्षत्रिय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आला होता. त्यात वज्रेश्वरी गावातुन जाणारा 450 मीटरचा रस्ता हा सप्टेंबरमध्ये बनविण्यात आला. मात्र सदर रस्ता हा अतिशय निकृष्ठ दर्जाचा झाला असून, एस्टीमेट नुसार झाला नसल्याने या रस्त्याला अवघ्या नव्वद दिवसात तडे गेले. रस्ता समपातळीत नसल्याने वाहने  चालविताना झटके बसत आहेत. तसेच रास्ता कडेचे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. गटाराचे तारतम्य दिसत नाही. 

याबाबत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व संघर्ष अभियानचे सुनील देवरे यानी रस्त्याचे काम सुरू असताना भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागचे अभियंता श्री पवार, यांना व सांबांधित विभागला येथे चाललेल्या निकृष्ट कामा बाबत वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

"वज्रेश्वरी येथील सिमेंट काँक्रीट येथिल रस्त्या बाबत तक्रार आली असून त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी स्वतः येत्या दोन दिवसात साइड वर भेट देणार असून रस्ताची पाहणी करणार,त्यात त्रुटी आढळल्यास सबांधित ठेकेदार व दोषींवर नकीच कारवाई केली जाईल"
अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, विभाग ठाणें

Web Title: Demand for road inspection in vajreshwari