दुकानांच्या पाट्या मराठीत लावण्याची शिवसेनेची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

दुकानांचे मुख्य फलक इंग्रजी भाषेत असणाऱ्या मालकांवर दुकाने व संस्था अधिनियमांतर्गत तातडीने कारवाई करा, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व दक्षिण रायगड संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन दुकाने व संस्था निरीक्षक बी. व्ही. लांडे यांना देण्यात आले.
 

डोंबिवली - दुकानांचे मुख्य फलक इंग्रजी भाषेत असणाऱ्या मालकांवर दुकाने व संस्था अधिनियमांतर्गत तातडीने कारवाई करा, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व दक्षिण रायगड संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन दुकाने व संस्था निरीक्षक बी. व्ही. लांडे यांना देण्यात आले.

येत्या एक महिन्यात जर सर्व इंग्रजी फलक/पाट्या मराठीत करण्यात आल्या नाहीत, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. शहरात अनेक दुकाने व संस्था यांचे मुख्य फलक सध्या इंग्रजी भाषेत आढळतात. सरकारी अधिनियमानुसार ते ठळकपणे मराठी भाषेतच पाहिजेत, अन्यथा कारवाई करण्याची तरतूद आहे. दुकाने निरीक्षक खात्याकडून होणाऱ्या हलगर्जीपणामुळेच दुकानमालक इंग्रजी फलक लावतात. मराठी फलक न लावणाऱ्या दुकांनावर तातडीने करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. 

 

Web Title: Demand for Shivsena to put shops in Marathi