कल्याण - जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बससेवा सुरू करा

रविंद्र खरात 
सोमवार, 23 एप्रिल 2018

कल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी मागणी सुयोग जेष्ठ नागरीक संघ लोकसंकुल कल्याण पूर्व अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड यांनी परिवहन समिती (केडीएमटी) सभापती सुभाष म्हस्के यांच्याकडे केली आहे आहे.

कल्याण : कल्याण पूर्वमधून लोक संकुल - लोकग्राम ते वाशी , बेलापूर, पनवेल, घणसोली, पामबीच या मार्गावर जेष्ठ नागरिकांसाठी केडीएमटी बस सोडावी अशी मागणी सुयोग जेष्ठ नागरीक संघ लोकसंकुल कल्याण पूर्व अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड यांनी परिवहन समिती (केडीएमटी) सभापती सुभाष म्हस्के यांच्याकडे केली आहे आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती (केडीएमटी) सभापती पदी सुभाष म्हस्के यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा जाहिर सत्कार काल (ता. 22) सुयोग जेष्ठ नागरीक संघ लोक संकुल कल्याण पूर्वच्या वतीने करण्यात आला. लोकधारा फेडरेशन हॉल मध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये जेष्ठ नागरिकांना अनेक समस्या येतात त्यावर साधक बाधक चर्चा झाली. यावेळी केडीएमटी बसेस लोक संकुल - लोकग्राम मधून ही सोडल्यास त्याचा जेष्ठ नागरिकांना फायदा होणार असल्याचे यावेळी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सांगण्यात आले. केडीएमटी बसमधून प्रवास करताना 50 टक्के सवलत द्यावी, कल्याण पश्चिम मधून वाशी, बेलापूर, पनवेल आणि अन्य ठिकाणी बसेस सोडतात त्या प्रमाणे कल्याण पूर्व मधील लोकग्राम - लोकसंकुल या परिसरातून बसेस सोडाव्यात त्यामुळे जेष्ठ नागरिकांना फायदा होईल.

नवी मुंबई मधील घणसोली पामबीच येथे मोठे साई बाबा मंदिर असून तेथे दर्शन घेण्यासाठी कल्याण पश्चिम पूर्व मधून अनेक जण जातात त्यासाठी कल्याण पूर्व पश्चिम मधून विशेष बसेस सोडाव्यात यावेळी मागणी करण्यात आली.  

राज्य शासनाच्या जेष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा ठाणे जिल्ह्यातील अनेक पालिका देते मात्र कल्याण डोंबिवली मनपा देत नाही याबाबत पाठपुरावा ही सुरू आहे तर याबाबत ही लक्ष्य देण्याची मागणी यावेळी जेष्ठ नागरिकांनी सभापती सुभाष म्हस्के यांच्या कडे समस्यां मांडल्या, यावेळी सभापती सुभाष म्हस्के यांनी जेष्ठ नागरिकांच्या मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्याचा मानस यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केले यावेळी सभापती सुभाष म्हस्के यांच्या समवेत सुयोग जेष्ठ नागरीक संघाचे जगन्नाथ गायकवाड , दत्तात्रय मराठे, ज्ञानेश्वर भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: demand for start public bus service for senior citizens