रेल्वे मेगाब्लॉकचे नियोजन न करणाऱ्या केडीएमटी अधिकारी वर्गाला निलंबित करण्याची मागणी 

रविंद्र खरात 
सोमवार, 9 एप्रिल 2018

केडीएमटी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागला याला जबाबदार असलेल्या केडीएमटी प्रभारी आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांना निलंबित करा, अशी मागणी केली जात आहे.

कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानक दरम्यान रविवार ता 8 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेतीनच्या मेगाब्लॉक होता. या कालावधीत नागरीकांच्या सोयीसाठी केडीएमटी बससेवा सोडणे अपेक्षित होते. मात्र केडीएमटी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागला याला जबाबदार असलेल्या केडीएमटी प्रभारी आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांना निलंबित करा, अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती (केडीएमटी) सभापती सुभाष म्हस्के सहित सदस्यांनी पालिका आयुक्त गोविंद राठोड यांची भेट घेऊन एक निवेदन देऊन केली आहे.

मध्य रेल्वे ने कल्याण ते कर्जत रेल्वे स्थानक दरम्यान रविवार ता 8 एप्रिल रोजी मेगाब्लॉक सकाळी साडे दहा ते दुपारी साडेतीनपर्यंत जाहीर केला होता. या कालावधीत केडीएमटी ने विशेष बस सोडाव्यात अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केडीएमटी प्रशासनाला केली होती. याधर्तीवर सभापती सुभाष म्हस्के सहीत समिती सदस्य मधुकर यशवंतराव, राजेंद्र दिक्षित, मनोज चौधरी आदींनी केडीएमटी प्रशासनाला रविवार ता 8 एप्रिल ला विशेष बस सोडण्याच्या सूचना ही दिल्या होत्या. रविवार ता 8 एप्रिल ला मेगाब्लॉक सुरू होताच नागरिकांचे फोन वाजू लागले. त्यानुसार नेमकी नागरिकांच्या काय समस्यां आहेत ते पाहण्यासाठी सभापती सुभाष म्हस्के, सदस्य राजेंद्र दिक्षित, मधुकर यशवंतराव, मनोज चौधरी यांनी रविवार ता 8 एप्रिल ला सकाळी 11 नंतर पाहणी दौरा केला. 

मेगाब्लॉक असल्याने नागरिक कल्याण पश्चिम मधील दीपक हॉटेल समोर उभे राहू लागले. या ठिकाणी रिक्षा चालकांनी त्याचा फायदा घेत प्रवासी भरू लागले. तर रेल्वे प्रशासन अधिकारी वर्गाची भेट घेऊन एसटी डेपो मधून केडीएमटी बसेस सोडण्याचे निश्चित झाले आणि घोषणा सुरू झाले मात्र प्रत्यक्ष पाहणी केले असता नागरीकांच्या रांगा नसल्याने परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के, सदस्य राजेंद्र दिक्षित, मधुकर यशवंतराव आणि मनोज चौधरी यांनी अधिकारी वर्गाला फोन करू लागले. मात्र त्यांना उत्तर येऊ लागले की बसेस आहेत मात्र कर्मचारी नसल्याने बसेस डेपो बाहेर काढू शकत नसल्याचे सांगण्यात आले. आपात्कालीन परिस्थिती मध्ये नागरीकांना सेवा देऊ शकत नसेल तर परिवहन सेवेचा काय उपयोग असा सवाल सदस्य मधुकर यशवंतराव आणि राजेंद्र दिक्षित यांनी केला आहे. एक दिवस अगोदर रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक जाहीर केले असताना बसेस नियोजन आणि स्वतः अधिकारी वर्गाने स्टेशन परिसरात हवे होते. मात्र अधिकारी घरी तर केडीएमटी वाहक आणि चालक या काळात नियोजन करत असल्याचे समोर आल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे.

आज सोमवार ता. 9 एप्रिल ला सभापती सुभाष म्हस्के, माजी सभापती संजय पावशे, राजेंद्र दिक्षित, मधुकर यशवंतराव आणि मनोज चौधरी यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेत केडीएमटी प्रभारी आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांना निलंबित करण्याची मागणी केली यावेळी कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त यांनी सदस्यांना दिले आहे .

नागरीकांना सेवा द्यावी यासाठी रेल्वे प्रशासनाने विनंती केल्याप्रमाणे माझ्या समवेत मधुकर यशवंतराव, राजेंद्र दिक्षित, मनोज चौधरी आदी सदस्यांनी कल्याण स्टेशन परिसर पिंजून काढले. बस सेवा नसल्याने अनेकांनी रिक्षा प्रवास केला. नियोजन ढिसाळ होते, याबाबत सूचना देऊन ही अधिकारी जागेवर नव्हते. यामुळे कामात हलगर्जी केल्याप्रकरणी प्रभारी आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांना निलंबित करण्याची मागणी पालिका आयुक्त यांना केक्याची माहिती सभापती सुभाष म्हस्के यांनी दिली.

याप्रकरणी माहिती नाही मात्र नागरीकांना सेवा न देणे हे गंभीर बाब आहे, याप्रकरणी चौकशी करू आणि दोषी अधिकारी वर्गावर कठोर कारवाई करू अशी माहिती पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The demand for suspension of the KDMT officer who is planning a railway megablock