परळ टर्मिनसवर जलद लोकल थांबा कधी मिळणार? प्रवासी संघटनेची मागणी

कुलदीप घायवट
Saturday, 23 January 2021

सध्या फक्त दोन जलद आणि एक अर्धजलद लोकल येथे  थांबते. मात्र, पीक अव्हरच्या वेळी जलद लोकलला थांबा देणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. 

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दादरप्रमाणे परळ टर्मिनस हे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाला जोडलेले स्थानक आहे. परळ हे कॉर्पोरेट हब आणि अनेक रूग्णालय असलेले ठिकाण आहे. बँका, फुल बाजार मोठ्या संख्येने असल्याने परळ स्थानकाचे रूपांतर प्रशस्त अशा ‘परळ टर्मिनस’ मध्ये करण्यात आले आहे. मात्र या टर्मिनसवर जलद लोकल थांबा दिला जात नाही. त्यामुळे दादरवरील गर्दीचे विभाजन आणि प्रवाशांना टर्मिनसचा लाभ होत नाही, अशी भूमिका प्रवासी संघटनांनी मांडली.

परळ टर्मिनसवरून सध्या कसारा, कर्जत दिशेकडील लोकल टर्मिनेट होतात. त्यामुळे प्रवाशांना परळ येथून प्रवाशांना बसण्यासाठी रिकामी लोकल मिळते. मात्र कसारा, कर्जत दिशेकडे मोठ्या संख्येने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी राहतात. त्यामुळे या प्रवाशांना जलद लोकल पकडण्यासाठी दादर येथे जावे लागते. परिणामी, दादर येथे गर्दीचे प्रमाण वाढते. हि गर्दी कमी करण्यासाठी परळ येथे जलद लोकलला थांबा देणे आवश्यक आहे.

महत्त्वाची बातमी :  काय, कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येते, नजर देखील जाते ?

सध्या फक्त दोन जलद आणि एक अर्धजलद लोकल येथे  थांबते. मात्र, पीक अव्हरच्या वेळी जलद लोकलला थांबा देणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. 

"परळ हे रुग्णालयाचे केंद्र आहे. त्यामुळे रुग्णालयातील नर्स, वार्ड बॉय, डॉक्टर यांची संख्या परळ स्थानकावर मोठ्या प्रमाणात आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने परळ स्थानकाला परळ टर्मिनस केले आहे. यामुळे प्रवाशांना रिकामी धीमी लोकल मिळते. मात्र जलद लोकल पकडण्यासाठी दादर स्थानक गाठावे लागते. यासह ठाणे, कल्याण येथे राहणारे आणि अंधेरी, वांद्रे, मुंबई सेंट्रल येथे राहणारे प्रवासी पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवासी दादर स्थानकावर येतात. या कारणामुळे मध्य रेल्वे मार्गावरील जलद लोकलला परळ येथे थांबा दिला पाहिजे. "

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

महत्त्वाची बातमी : भर पंखांतून स्वप्न उद्याचे ! विद्यार्थ्यांनी बनवलेले तब्बल 100 उपग्रह झेपावणार अवकाशात

"अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी अशा प्रवाशांसाठी लोकल सेवा सर्वप्रथम सुरु केली. त्यानंतर अन्य क्षेत्रातील कर्मचारी, महिला वर्ग यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. परळ येथे वैद्यकीय कर्मचारी, महिला कर्मचारी, बँकेतील कर्मचारी यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या प्रवाशांना सोयीस्कर रित्या प्रवास करण्यासाठी परळ टर्मिनसवर थांबा देणे आवश्यक आहे. त्यामुळे दादर येथील गर्दीचे विभाजन होईल. "

- मधू कोटियन, सदस्य, विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती 

demand of the travel association for the halt of fast trains at parel terminus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand of the travel association for the halt of fast trains at parel terminus