गणेशोत्सव काळातील विसर्जनावरिल खर्चाची मनसेच्या वतीने लेखी मागणी 

गणेशोत्सव काळातील विसर्जनावरिल खर्चाची मनसेच्या वतीने लेखी मागणी 

सरळगांव (ठाणे) - या वर्षीच्या गणेशोत्सव काळातील विसर्जनावर मुरबाड नगरपंचायतीने किती खर्च केला आहे. याची माहीती मिळावी असी मागणी मुरबाड मनसेच्या वतीने लेखी स्वरूपात करण्यात आली आहे. 

या वर्षी गणपती विसर्जना नंतर नदी घाटावर राणीचे साम्राज्य अशा प्रकारची बातमी प्रसिध्द झाली होती. मुरबाड नगरपंचायतीने विसर्जनाच्या वेळी स्वच्छते साठी केलेला खर्च व प्रत्यक्षात दिसून आलेल्या सुविधा यात फरक जाणवत असल्याने विसर्जनाच्या काळात  नगरपंचायतीच्या वतिने किती खर्च केला असल्याची माहीती मिळावी अशा प्रकारची लेखी मागणी मनसेच्या वतिने  केल्याची माहीती मुरबाड शहर अध्यक्ष नरेश देसले यांनी दिली .          

नगरपंचायतीचा पैसा हा जनतेच्या टॅक्स रूपाने आलेला पैसा असतो. तो योग्य ठिकाणी खर्च होणे गरजेचे आहे. मुरबाड  शहरातील गणेशोत्सव काळातील गणपती विसर्जन मुरबाड शहरा लगत असलेल्या नद्दीवर करण्यात आले होते. मात्र गणपती विसर्जनाच्या तिस-या दिवशीही नदीकिना-याची साफसफाई झाली नव्हती. या ठिकाणी केलेल्या सूविधा व नगरपंचायतीच्या वतिने या कामासाठी  खर्ज केलेले पैसे व प्रत्यक्षात झालेले स्वच्छतेचे काम या मध्ये मोठी तफावत दिसत असल्याने जनते मध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com