डोंबिवली - शीळ रस्त्यावरील मानपाडा चौकात निदर्शने

संजीत  वायंगणकर
गुरुवार, 26 जुलै 2018

डोंबिवली - नगरसेवकांविरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करत भ्रष्ट महापालिकेला कडाडून विरोध व 27 गावांसाठी नगरपालिकेची एकमुखी मागणी करुन गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास शीळ रस्त्यावरील मानपाडा चौकात सर्व पक्षिय युवा मोर्चातर्फे युवा भुमीपुत्रांनी निषेध व निदर्शने केली. वर्षानुवर्षे समाजला संघर्ष करायला भाग पाडून स्वार्थ साधत असलेल्या सर्व पक्षिय हक्क संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकवटलेला समाज आज दुभंगाला असल्याचे चित्र यामुळे समोर आले. 27 गावातून संघर्ष समितीतर्फे निवडून आलेले नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेतून बाहेर पडण्यास तयार नाहीत.

डोंबिवली - नगरसेवकांविरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करत भ्रष्ट महापालिकेला कडाडून विरोध व 27 गावांसाठी नगरपालिकेची एकमुखी मागणी करुन गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास शीळ रस्त्यावरील मानपाडा चौकात सर्व पक्षिय युवा मोर्चातर्फे युवा भुमीपुत्रांनी निषेध व निदर्शने केली. वर्षानुवर्षे समाजला संघर्ष करायला भाग पाडून स्वार्थ साधत असलेल्या सर्व पक्षिय हक्क संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकवटलेला समाज आज दुभंगाला असल्याचे चित्र यामुळे समोर आले. 27 गावातून संघर्ष समितीतर्फे निवडून आलेले नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेतून बाहेर पडण्यास तयार नाहीत. व नवीन नगरपालिकेसाठी सर्व समाजबांधवांनी घेतलेल्या हरकती बोगस असल्याचे वक्तव्य करणारे याच समितीतील चंद्रकांत पाटील व प्रकाश म्हात्रे हे समाजविरोधात कृती करत आहेत म्हणून यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला. 

मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो. भ्रष्ट महापालिकेची हाव धरणार्यांचा धिक्कार असो. 27 गावातील भुमीपुत्रांच्या हरकती व सुचनांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो. या मजकुराचे कागदी फलक तसेच काही बोलकी व्यंगचित्रे हातात घेऊन व काळे कपडे परिधान करुन उपस्थित भुमीपुत्रांनी आपला निषेध नोंदविला. कारगिल विजयाचा विजय दिन असूनही काळ्या कपड्यात निषेध करावा लागल्यांची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी गणेश म्हात्रे,गजानन पाटील, संतोष केणे, रमेश म्हात्रे, राहुल केणे, रविंद्र पाटील आदिेसह मोठ्या संख्येने 27 गावातील सर्व पक्षिय तरुण व नागरिक उपस्थित होते.   

यावेळी मार्गदर्शन करताना बनाबाई संते या वृध्दा म्हणाल्या , महापालीकेत गावाचा विकास होईल म्हणूनच मोठ्या विश्वासाने आपण आपल्या समाजबांधवांना नगरसेवक केले परंतू तीन वर्षे झाली काहीच विकास नाही उलट रस्ते,पिण्याचे पाणी, आरोग्य, कचरा या समस्या वाढल्या व भरमासाठ मालमत्ता कराची मागणी होते आहे, म्हणून आता बाहेर पडून आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या भविष्यासाठी नगरपालिकेची मागणी फक्त तुम्ही तरुणांनी न करता समाजातील महिलांनी रस्त्यावर उतरुन त्याला साथ देण्याची गरज आहे. 

Web Title: Demonstration in Manpada Chowk at Sheel fata