मंत्रालयात देना बॅंकेचे फिरते एटीएम

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटांची चणचण भासत आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा आहेत. मात्र, पैसे काढता येत नाहीत. तसेच एटीएमच्या बाहेर रांगाच्या रांगा आहेत. अशा परिस्थितीत देना बॅंकेने मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी खास फिरते एटीएम वाहन मंत्रालयात आणले होते. या वाहनातील एटीएम यंत्रातून अडीच हजार रुपये इतकी रक्‍कम काढता येत आहे. या फिरत्या वाहनातून पैसे काढण्यासाठीही मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्या रांगा लागल्या होत्या. डेबिट कार्ड स्वाइप करूनही थेट पैसे देण्याची सेवा देना बॅंकेने सुरू केली आहे.

मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटांची चणचण भासत आहे. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा आहेत. मात्र, पैसे काढता येत नाहीत. तसेच एटीएमच्या बाहेर रांगाच्या रांगा आहेत. अशा परिस्थितीत देना बॅंकेने मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी खास फिरते एटीएम वाहन मंत्रालयात आणले होते. या वाहनातील एटीएम यंत्रातून अडीच हजार रुपये इतकी रक्‍कम काढता येत आहे. या फिरत्या वाहनातून पैसे काढण्यासाठीही मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्या रांगा लागल्या होत्या. डेबिट कार्ड स्वाइप करूनही थेट पैसे देण्याची सेवा देना बॅंकेने सुरू केली आहे. ही सेवा देना बॅंकेच्या खातेधारकांसह सर्वांसाठी आहे, असे देना बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक आशिष घोटणकर यांनी या वेळी सांगितले.

Web Title: dena bank movable atm in mantralaya