मुंबईकरांच्या गळ्याभोवती डेंगीचा फास!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मुंबई - ऑक्‍टोबर महिन्यात मुंबईत डेंगीचे रुग्ण वेगाने वाढत असल्याची नोंद पालिकेच्या पंधरवड्यातील अहवालात करण्यात आली आहे. १५ दिवसांत मुंबईभर डेंगीसदृश दोन हजार १७३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १८३ जणांना डेंगीची बाधा झाली आहे. यंदाच्या वर्षात मुंबईत १२ रुग्णांचा डेंगीने मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने एडिस इजिप्ती डासांसाठी विशेष सर्वेक्षण हाती घेतले आहे.

पालिकेने ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून एडिस इजिप्ती डासांच्या सर्वेक्षणासाठी २४ वॉर्ड पालथे घालण्यास तातडीने सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये तीन हजार २९३ डेंगीसदृश रुग्ण पालिकेच्या अहवालात आढळून आले होते. त्या तुलनेत यंदा पंधरवड्यातच डेंगीसदृश रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली. त्यामुळे १ ते ११ ऑक्‍टोबरपर्यंतच्या अहवालात मुंबईत एक हजार ७६ ठिकाणांना पालिकेच्या कीटकनाशक विभागाने भेटी दिल्या. त्यात तीन लाख २९ हजार ५९४ घरांची तपासणी करण्यात आली. तब्बल दोन हजार १०८ ठिकाणी एडिस इजिप्ती जातीच्या अळ्या सापडल्या. हिवतापामुळेही ८ ऑक्‍टोबर रोजी ३९ वर्षांच्या रुग्णाला जीव गमवावा लागला. गेल्या सप्टेंबर महिन्यात चार वर्षांच्या मुलीचाही बळी गेला. तिला दोन आठवड्यांपासून जुलाबाचा त्रास होत होता. १७ सप्टेंबरला तिला पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु दोन दिवसांतच तिचा मृत्यू झाला.

Web Title: Dengue in mumbai