सीवूड्‌समध्ये डेंगीचे रुग्ण वाढले
सीवूड्‌समध्ये डेंगीचे रुग्ण वाढले

सीवूड्‌समध्ये डेंगीचे रुग्ण वाढले

नवी मुंबई : सीवूडस परिसरात गेल्या दोन आठवड्यांत १५ ते २० डेंगीचे रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारपासून २ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सीवूडसमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या आठवड्यात या भागात धूरफवारणी करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्यानेच डेंगीच्या रुग्णांत वाढ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही सीवूडसमध्ये डेंगीचे संशयित रुग्ण आढळल्याचे मान्य केले. मात्र त्यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले. सीवूडस रुग्णालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांच्या अवधीत जवळपास १५ ते २० डेंगीच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. आताही अंकुश यादव (६०), अभय कुमार (२४) या दोन रुग्णावर उपचार सुरू आहेत. हे दोन्ही रुग्ण सेक्‍टर ४४ मध्ये राहणारे आहेत. 

सीवूडस परिसरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. माझ्यावर उपचार सुरू झाले, त्याच दिवशी चार रुग्णांना घरी पाठवण्यात आले होते. 
- अंकुश यादव, रुग्ण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com