देवनार पुन्हा धुमसणार! कचऱ्यावरून मुंबई पालिकेत पुन्हा रणकंदन; वादानंतर सुधारित हजार कोटींचा प्रस्ताव

समीर सुर्वे
Saturday, 5 September 2020

देवनार डम्पिंगवरील 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत 1 हजार 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

मुंबई : देवनार डम्पिंगवरील 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत 1 हजार 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावरुन वर्षाच्या सुरवातीलाच पालिकेत वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सुधारीत प्रस्तावावरुनही महापालिकेत राजकारण रंगणार आहे.

निम्म्या हृदयविकार रुग्णांनी तातडीचे उपचार टाळले; अभ्यासातून माहिती समोर!

देवनार येथे रोज 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला होता. त्यावेळी शिवसेनेने उपसुचना मांडून दुसऱ्या क्रमाकांची कमी किंमत सादर केलेल्या कंत्राटदाराला 1291 कोटी रुपयांचा ठेका दिला होता. यावेळी प्रशासनाने त्यांना हव्या असलेल्या कंत्राटदाराला ठेका देणासाठी निविदा प्रक्रियेत फेरफार केल्याचा आरोप केला होता. मात्र, नंतर हा प्रस्तावही रद्द करण्यात आला. आता महापालिका प्रशासन सुधारित प्रस्ताव तयार करत आहे. या प्रस्तावाला प्रशासकिय मान्यता घेऊन तो स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येईल. प्रस्ताबाबचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले.

तर, शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घालेल'; संजय राऊतांची कडक शब्दात टीका

25 वर्षांसाठी हे काम सुरु राहाणार आहे. पहिल्या टप्प्यात रोज 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर दोन 1200 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येतील. असे एकूण 3000 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असतील, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर 80 वर्षांहून अधिक काळापासून कचरा टकला जात आहे. आता या डंपिंगची क्षमता संपली असून अनेक वेळा भीषण आगीही लागल्या आहेत. त्यामुळे पालिकेतर्फे हे प्रकल्प राबवले जात आहे.

मुंबई - पुणे - मुंबई एक्स्प्रेस कधी सुरू होणार? रेल्वे प्रशासनाकडून मिळतेय ही माहिती

असा आहे प्रकल्प
- रोज 600 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया  
- 10 मेगावॅट विजेची निर्मीती 
- भविष्यात 3000 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया 
-  त्याद्वारे 30 ते 35 मेगावॅट विजेची निर्मीती 

 

वायूप्रदुषणाचाही स्त्रोत
देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये 1927 पासून कचरा टाकला जात आहे. पालिकेच्या एका अभ्यासानुसार येथे 127 लाख टन कचरा जमा आहे. दर तासाला 5983 घनमीटर वायू येथून उत्सर्जित होतो. त्यात ज्वलनशील मिथेनसह कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात असतो.

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deonar will be smoldering again! Rankandan again in NMC due to revised proposal of Rs. 1000 crore