विभाग कार्यालये कात टाकणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - नागरिकांना अनेक वर्षांपासून सुविधा देणाऱ्या कोपरखैरणे आणि घणसोली विभाग कार्यालयांचे नूतनीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. १९९८ मध्ये सिडकोने महापालिकेकडे कामकाज हस्तांतरित केले, त्या वेळी कोपरखैरणे विभाग कार्यालयाची इमारत पालिकेकडे हस्तांरित झाली होती. घणसोली येथील इमारतीचीही दुर्दशा झाल्यामुळे तिच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ३२ लाखांच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

कोपरखैरणे येथील विभाग कार्यालयाच्या इमारतीमध्ये सध्या तळमजल्यावर बॅंक आहे. पहिल्या मजल्यावर एका बाजूला विभाग कार्यालयाचे कामकाज; तर दुसऱ्या बाजूला परिमंडळ-२ उपायुक्त कार्यालय आहे. दुसऱ्या मजल्यावर एका बाजूला सिडकोचे कार्यालय आहे; तर दुसऱ्या बाजूला पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय आहे. तिसऱ्या मजल्यावर महापालिकेच्या एलबीटी विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. तिन्ही मजल्यांवर कार्यालयांची स्थिती सुनियोजित नसल्यामुळे कामकाजातही अडथळे येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पाहणी करून मॉड्युलर फर्निचर तयार करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.

तळ मजल्यावर  पार्किंग
घणसोली विभाग कार्यालयाची इमारत २००० मध्ये बांधली आहे; मात्र त्या वेळी वाहनतळाची व्यवस्था न केल्यामुळे येथे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे इमारतीच्या तळमजल्यावरील बांधकाम तोडून पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. कार्यालयीन नागरी सुविधा केंद्र व कॅशियरसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मॉड्युलर फर्निचर, अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी केबिन्स, सभा, संमेलन कक्ष, क्‍युबिक वर्क स्टोअरेज आणि लिफ्टची व्यवस्था केली जाणार आहे.

Web Title: Department offices will be cut off