'नववर्ष स्वागतासाठी पोलिस यंत्रणा सज्ज, बिनधास्त पडा बाहेर'

रविंद्र खरात 
शनिवार, 29 डिसेंबर 2018

कल्याण  : '' 31 डिसेंबरची रात्र वर्षा अखेर आणि 1 जानेवारी 2019 ला नवीन वर्ष स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित होणार आहे. याधर्तीवर पोलीस बंदोबस्त विविध ठिकाणी ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवलीकरानो बिनधास्त घराबाहेर पडा'' ,असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी केले आहे .

कल्याण डोंबिवली शहरात सात पोलीस ठाणे असून या हद्दीत सोमवारी (ता 31) रात्री होणाऱ्या नवं वर्ष स्वागत पार्टीवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी कल्याण आणि डोंबिवलीमध्ये प्रवेश करणाऱ्या पूल आणि रस्त्यावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. लॉज, हॉटेल, ढाबे, बार यांची पोलिसांमार्फत तपासणी करण्यात येणार असून आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तर याकालावधीत होणारी गर्दी पाहता महिलाच्या छेडछाड वर आळा घालण्यासाठी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मद्य आणि अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालवू नका असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी केले असून यावर आळा घालण्यासाठी नाकाबंदी सोबत मद्य प्राशन करणाऱ्या चालका विरोधात ब्रेथ अँनालायझर मार्फत कारवाई करण्यात येणार आहे. डीजे लावून ध्वनी प्रदूषण होणार नाही असे आवाहन यावेळी उपायुक्त शिंदे यांनी केले आहे . कडेकोट पोलीस बंदोबस्तसाठी स्वतः पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे असणार असून त्यांच्या समवेत 2 सहायक पोलीस आयुक्त , 16 पोलीस निरीक्षक , 64 सहायक पोलिस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक , 587 पोलीस कर्मचारी , 64 महिला कर्मचारी , आदी बंदोबस्त असून नव वर्ष स्वागत बिनधास्त करा मात्र शांततेत करा असे आवाहन यावेळी पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी के

Web Title: Deputy Commissioner of Police Apeal to people to enjoy new year eve