जयंत सुर्यराव यांना देशमुख मराठा समाज भूषण पुरस्कार

नंदकिशोर मलबारी
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

सरळगांव (ठाणे) -  भाजपाचे मुरबाड तालुका अध्यक्ष व मनमिळाऊ स्वभाव असलेले जयंत सुर्यराव यांना देशमुख मराठा समाज भूषण पुरस्काराने संन्मानित करण्यात आले. 

सरळगांव (ठाणे) -  भाजपाचे मुरबाड तालुका अध्यक्ष व मनमिळाऊ स्वभाव असलेले जयंत सुर्यराव यांना देशमुख मराठा समाज भूषण पुरस्काराने संन्मानित करण्यात आले. 

ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाज उन्नती मंडळाच्या वतिने शैक्षणीक गूणगौरव समारंभ समाजाचे अध्यक्ष बाळाराम सुर्यराव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सुर्यराव यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही समाज व इतर समाजा साठी सतत कार्यरत राहून कामे केली. 2002  साली राजकारणातील कामाची लकप पाहून भाजपाने त्यांना तालुका अध्यक्ष पदाची धूरा दिली. तालुक्याची मिळालेली जबाबदारी ओळखून सर्वाना एकत्र करून मुरबाड तालुक्यात भाजपाच्या पडत्या काळात सर्वाना एकत्र ठेवण्याची कामगीरी करत व त्या नंतर भाजपाला  एक खासदार व एक आमदार आपल्या  तालुका अध्यक्षतेच्या काळात पक्षाला निवडून  दिल्याने आजही ते तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तालुक्यात काम करत असताना  समाज व इतर समाज असा भेदभाव न मानता कधी स्वताची तर कधी पक्षाची ताकद वापरून जनतेची कामे करीत राहिले. प्रतिकूल परीस्थिती असतानाही आपल्या समाजा बरोबरच इतर समाजातील ग्रामिण भागातील मुले शैक्षणीक क्षेत्रात मागे राहू नये. त्यांना योग्य वयात शिक्षण मिळाले पाहीजे म्हणून पदरमोड करीत त्यांनी  सिध्दगड विद्यालय डोंगरन्हावे हे विद्यालय सूरू करून अनेक गरीब घराण्यातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम त्यांनी केले. ही सर्व कामाची दखल देशमुख मराठा समाजाने घेऊन त्यांना जिल्हास्तरीय कार्यक्रमात समाजाचे अध्यक्ष बाळाराम सुर्यराव, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र आण्णासाहेब पाटील, समाजाचे जेष्ठ नेते तानाजी देशमुख व वकील प्रमोद चौधरी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deshmukh Maratha Samaj Bhushan Award for Jayant Surya Rao