गरोदर असूनही 'ती' जागली आपल्या कर्तव्याला!

opration
opration

उल्हासनगर : स्वतः 7 महिन्याची गरोदर असतानाही उल्हासनगरातील सरकारी रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने एका रिक्षाचालकाच्या पत्नीचे सुमारे तीस तास ऑपरेशन करून तिच्या पोटातून तीन किलोचा मांसाचा गोळा काढून या महिलेचा जीव वाचवला आहे. गरोदर असतानाही तीन तास ऑपरेशनसाठी उभ्या राहणाऱ्या या धाडसी महिला डॉक्टरला वरिष्ठ डॉक्टरांनी शाबासकी दिली आहे. हा गोळा पुढील तपासणीसाठी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात पाठवला गेला आहे.

रिक्षाचालक विश्वास महाडिक हे खुंटवली गावात राहतात. त्यांच्या पत्नी प्रियांका (50) हिच्या पोटात मागील आठवड्यात दुखू लागल्याने प्रियांकाला 5 दिवसांपूर्वी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टर मृणाली राऊळ यांनी प्रियंकाला दाखल करून घेतल्यावर तात्काळ स्त्री रोग तज्ञ डॉक्टर तृप्ती रोकडे यांनी तपासणी केली. प्रियांकाची प्रकृती ढासळू लागल्यावर डॉक्टर तेजस्विनी गोसावी आणि पडाळकर यांनी सोनोग्राफी केली. सोनोग्राफीच्या अहवालात पोटात मोठी गाठ असल्याचे दिसून आले. ही माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आणून शस्त्रक्रियेसाठी मान्यता घेण्यात आली.

याबाबत स्त्री रोग तज्ञ तृप्ती रोकडे यांनी सांगितले की, प्रियांकाला तीन अपत्ये असून तिन्ही वेळा सिजर झालेली आहेत. तसेच कुटुंब कल्याण योजनेची ही शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करणे कठीण होते. त्यामुळे प्रथम मुंबईच्या रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. मात्र नंतर प्रकृती अधिक बिघडत असल्याने शुक्रवारी दुपारी प्रियंकाला शस्त्रक्रियेसाठी घेतले. तेव्हा तिच्या पोटातून तब्बल तीन किलो वजनाचा गोळा काढण्यात यश आले. हा गोळा कॅन्सरचा आहे का हे तपासण्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले आहे. 

तब्बल तीन तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर प्रियंकाचे पती विश्वास महाडिक यांनी डॉक्टरांचे आभार मानले. या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर जे. आर. निंभोरे, डॉक्टर तेजस्विनी गोसावी, डॉक्टर तृप्ती रोकडे, डॉक्टर नीती बर्वे, डॉक्टर स्मिता कुलकर्णी, परिचरिका सुमन गोवंदे, साक्षी राठोड, प्रिया चक्रे, अनिता देसाई, सहाय्यक मनोहर भोपी, गोपाळ इंगळे, भालचंद्र शिंदे, समाजसेवा अधिक्षक सतीश वाघ, कुमार गायकवाड यांचे जिल्हा शल्य चिकित्सक सुधाकर शिंदे यांनी कौतुक केले.

डॉक्टर तृप्ती रोकडे ह्या सात महिन्याच्या गरोधर
प्रियांका महाडिक पोटात दुखत असताना डॉक्टर तृप्ती रोकडे मनावर दडपण आणत शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. ह्या शस्त्रक्रिये दरम्यान प्रियांका यांचे वय अधिक, त्यांची मानसिक पाळी बंद तसेच यापूर्वी चार शस्त्रक्रिया झालेल्या असल्याने तृप्ती रोकडे यांचा निर्णय धाडसी होता. हे धाडस करणाऱ्या डॉक्टर रोकडे ह्या स्वतः सात महिन्यांच्या गरोदर असल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक सुधाकर शिंदे यांनी रोकडे मॅडम यांचे विशेष कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com