उल्हासनगरात वस्त्या उध्वस्त करून कब्रस्तानचा खटाटोप

दिनेश गोगी
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : यापूर्वी महाराष्ट्र शासनाने  म्हारळच्या हद्दीतील 58 क्रमांकाच्या भूखंडावर कब्रस्तान जाहीर केलेले होते.मात्र उल्हासनगरच्या विकास आराखड्यात या भूखंडावरील आरक्षण हटवण्यात आले असून आता चक्क गोरगरीब राहत असलेल्या वस्त्या उध्वस्त करून त्यावर कब्रस्तान करण्याचा खटाटोप भाजपाच्या संगनमताने पालिकेने सुरू केला आहे. विशेष या वस्त्यांत मुस्लिम देखील राहत असून शिवसेनेने या वस्तीला भेट देऊन वस्ती उध्वस्त होऊ देणार नाही. असे आश्वासन नागरिकांना दिले आहे.

दुसरीकडे कब्रस्तान मिळावे ही आमची प्रमुख मागणी असून तो आमचा अधिकार आहे.मात्र कुणाचे घरे तोडून संसार उध्वस्त करून त्यावर आम्हाला कब्रस्तान नकोच अशी माणुसकी पुरोगामी मुस्लिम सामाजिक संघटना,अहलेवतन मुस्लिम सामाजिक संघटना यांनी दाखवली आहे.
कॅम्प नंबर 5 मधील कैलास कॉलनी परिसरात असलेला भूखंड नंबर 245 हा मुस्लिमांच्या कब्रस्तानसाठी देण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने 24 जुलै 2018 रोजी न्यायालयात सादर केलेले आहे.त्यावर वस्ती असून जागा खाली करण्याच्या नोटिसा पालिकेने नागरिकांना दिल्या आहेत.

शिवसेना शाखाप्रमुख असलेले ऍड.सत्येन पिल्ले यांनी ही बाब शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी काल सायंकाळी सदर भूखंड व त्यावर वसलेल्या वस्तीची पाहणी नागरिकांसोबत केली.किणीकर यांच्यासोबत ऍड.सत्येन पिल्ले,ऍड.कल्पेश माने तसेच वस्तीत राहणारे मुस्लिम बांधव देखील होते.या वस्तीत अनेक वर्षापासून तिनशेच्या आसपास नागरिक राहतात.कब्रस्तान हे मोकळ्या भूखंडावर असावे.संसार करता येणार नाही.असा मोकळा भूखंड कब्रस्तान करिता देण्यात यावा,नागरिकांच्या संसारावर बुलडोझर फिरवू नये अशी मागणी शासनदरबारी करणार.असे आश्वासन आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी नागरिकांना दिले आहे.

Web Title: destroy homes and plan for kabrastan in ulhasnagar