तांब्याचे वॉल चोरणारी टोळी अटकेत

तांब्याचे वॉल चोरणारी टोळी अटकेत


ठाणे : गोदामातून तांब्याचे वॉल चोरणाऱ्या टोळीला मंगळवारी (ता.१२) नारपोली पोलिसांनी अटक केली. अक्षय पाटील, किशोर पाटील, नरेंद्र मिश्रा यांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख ५३ हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.भिवंडी येथील दापोडा भागात २ नोव्हेंबरला एका गोदामातून तांब्याच्या वॉलची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात उपनिरीक्षक आर. जे. व्हरकाटे यांच्या पथकाने सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासले. त्यानंतर पोलिसांनी अक्षय, किशोर आणि त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी केली असता त्यांनी हे वॉल नरेंद्र मिश्राला विकल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी नरेंद्रलाही ताब्यात घेतले. याप्रकरणी अक्षय, किशोर आणि नरेंद्रला अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com