विकासकामांचा प्रचार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

ठाणे -  पालिका निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहचला असून, कळव्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारात विकासकामांचा मुद्दा मतदारांसमोर ठेवला आहे. शहरात भाजप-शिवसेनेकडून कुरघोडीचे राजकारण सुरू असताना कळव्यात मात्र विकासाचा मुद्दा चर्चेत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. 

ठाणे -  पालिका निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहचला असून, कळव्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी प्रचारात विकासकामांचा मुद्दा मतदारांसमोर ठेवला आहे. शहरात भाजप-शिवसेनेकडून कुरघोडीचे राजकारण सुरू असताना कळव्यात मात्र विकासाचा मुद्दा चर्चेत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. 

रेल्वेस्थानक परिसराची सुधारणा, कळवा चौपाटी, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, पालिका शाळांच्या इमारतींचे नूतनीकरण, मार्केट, पादचारी पूल, व्यायामशाळा, वाचनालय, पाणी व्यवस्थेत सुधारणा अशी कामे उमेदवारांची जमेची बाजू ठरत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा युवा कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मंदार केणी यांनी या विकासकामांचा फायदा स्थानिक उमेदवारांना होईल, असा दावा केला आहे. 

कळव्याच्या विकासाचा वेग मोठा असून ठाण्यापेक्षा तेथील सुखसोईंमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ठाण्याअगोदर कळवा, मुंब्रा स्थानकात वायफाय सुरू झाले. कळवा स्थानक परिसरात अडकलेली कामे काही दिवसांमध्ये वेगाने मार्गी लागली असून, सगळ्याच पक्षांकडून या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, याचा फायदा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना अधिक होण्याची शक्‍यता आहे. या भागात राष्ट्रवादीचे आमदार असल्यामुळे तिथे पक्षाचे प्राबल्य दिसते. या भागात पाच वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शहरात सर्वच राजकीय पक्षांकडून विद्वेषाचे राजकारण केले जात आहे. टीका, हल्ले-प्रतिहल्ले, एकमेकांच्या पक्षातील उमेदवारांच्या खेचाखेचीला वेग आला असताना कळव्यात मात्र वेगळे चित्र आहे. या भागातील प्रचारात येथील उमेदवारांकडून विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मतदारांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये जिल्हा अध्यक्ष मंदार केणी विशेष प्रयत्न करत असून, त्यांचे कुटुंब या निवडणुकीमध्ये उतरले आहे. या भागातील राष्ट्रवादीचे उमेदवार मुकुंद केणी व प्रमिला केणी हे प्रस्थापित असून, कामांच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मंदार केणी यांनी दिली.

Web Title: development promotion