५२६ कोटींच्या विकासकामांना चालना मिळणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

नवी मुंबई - मुख्य औषध भांडार गृह, तुर्भे कचराभूमीचा पाचवा विभाग बंद करणे, विविध कार्यक्रमांसाठी व्यासपीठ तयार करणे, बसस्थानक, जलतरण तलाव अशा अनेक प्रकारच्या नागरी सुविधांची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. सुमारे ५२६ कोटींची विकास कामे महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सर्वसाधारण सभेच्या पटलावर आणली आहेत. विशेष म्हणजे शनिवारी (ता.१९) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शहराच्या नावलौकिकात भर घालणारे सायन्स पार्क उभारण्याबाबत आणि शहरात महत्त्वाचे चौक आणि स्थळांवर लक्ष ठेवण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. 

वाशीत सुसज्ज जलतरण तलाव, अद्ययावत वाणिज्य संकुल, आंतरक्रीडा संकुल असावे, अशी मागणी होती. त्यानुसार वाशी सेक्‍टर १२ येथील भूखंड क्रमांक १९६ व १९६ ए या दोन भूखंडांवर तलाव, क्रीडा आणि वाणिज्य संकुल साकारले आहे. यासहित घणसोली सेक्‍टर ७ येथे भूखंड क्रमांक १० वर समाज मंदिर तयार करण्यात येणार आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयांना पुरवल्या जात असलेल्या औषधांसाठी मुख्य औषध भांडार गृह निर्मिती केली जाणार आहे. घणसोली सेक्‍टर ९ येथील भूखंडावर तीन मजली इमारत उभारली जाणार आहे. या इमारतीमार्फत मध्यवर्ती औषध पुरवठा केला जाणार आहे. या कामांसहित तुर्भे येथील पालिकेचा कचरा भूमी प्रकल्पातील पाचवा विभागही बंद करण्यात येणार आहे. तसेच पाणीपुरवठा, विद्युत आदी विकास कामेही करण्यात येणार आहेत. 

Web Title: development works of Rs. 526 crores will be expedited